JOIN US
मराठी बातम्या / मनी / Business Idea: 25 रुपयांचे होतील शेडको रुपये! फक्त हजार रुपयात घरीच सुरु करा हा बिझनेस, सरकारही करेल मदत!

Business Idea: 25 रुपयांचे होतील शेडको रुपये! फक्त हजार रुपयात घरीच सुरु करा हा बिझनेस, सरकारही करेल मदत!

Multani Mitti Business: मुलतानी मातीचा वापर त्वचा आणि सौंदर्य उजळ करण्यासाठी दीर्घकाळापासून केला जातोय. महत्त्वाचं म्हणजे याचे कोणतेही साइड इफेक्ट नाही. कमी पैशात हा व्यवसाय सहज सुरु करता येऊ शकतो.

जाहिरात

मुलतानी माती बिझनेस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Business Idea: दिवसेंदिवस लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक होत आहेत. त्यामुळे केमिकल फ्री आणि नॅचरल ब्यूटी प्रोडक्ट्सची मागणी वाढतेय. ब्युटी प्रोडक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर त्यांची मागणी वर्षानुवर्षे कायम आहे. बाजारात अनेक प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही खूप महाग आहेत. तुम्ही त्यांचा बिझनेस सुरू केला तर तुम्हाला त्यात अधिक गुंतवणूक करावी लागेल. मात्र, काही ब्यूटी प्रोडक्ट्स आहेत ज्यांचा व्यवसाय अगदी स्वस्तात सुरू केला जाऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे यातून तुम्ही भरपूर नफा देखील कमावू शकता. असाच एक मुल्तानी मातीचा बिझनेस आहे. जो तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरु करुन चांगली कमाई करु शकता.

त्वचा आणि सौंदर्य सुधारण्यासाठी मुलतानी मातीचा वापर अनेक शतकांपासून केला जातोय. त्याचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत. मुलतानी मातीच्या पावडरला दूध, गुलाबजल किंवा साध्या पाण्यात मिसळून डायरेक्ट फेसपॅक म्हणून वापरलं जाऊ शकतं. तुम्ही कमी पैशात व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. असा सुरु करा मुल्तानी मातीचा व्यवसाय तुम्ही मुलतानी माती मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकता. मुलतानी मातीची पोती 20 ते 25 रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही ही पावडर घरी बनवू शकता आणि प्रत्येकी 100 ग्रॅमच्या लहान पॅकेटमध्ये पॅक करू शकता. तुम्ही 100 ग्रॅमचे हे पॅकेट स्थानिक दुकानदाराला 20 रुपये प्रति पॅकेट दराने विकू शकता. सर्व खर्च काढल्यानंतर, तुम्ही प्रति पॅकेट 12 रुपये जरी काढले, तर अशा प्रकारे तुम्हाला एका किलोवर 120 रुपये नफा मिळेल. जर तुम्ही दररोज असे 50 पॅकेट पुरवले तर तुम्ही दररोज 600 रुपये कमवू शकता. ऑनलाइनही सुरु करु शकता बिझनेस दुसरीकडे, तुमचा व्यवसाय आणखी वाढवायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाइनही सुरु करु शकता. म्हणजेच तुम्ही तुमचं प्रोडक्ट Amazon किंवा Flipkart सारख्या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील विकू शकता. येथे विक्री करून तुम्हाला मोठा नफा मिळेल. मुलतानी मातीचे 100 ग्रॅम पॅकेट ई-कॉमर्स साइटवर 60-70 रुपयांना विकले जाते. म्हणजे एका किलोवर तुम्हाला 700 रुपये नफा मिळू शकतो. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट्च्या पॅकिंग आणि ब्रँडिंगकडे लक्ष द्यावे लागेल. यासोबतच आधीच बाजारात विकल्या जात असलेल्या कंपनीच्या प्रोडक्टचाही अभ्यास करावा लागेल. Business Idea: कमी पैशांत सुरु होईल बिझनेस, दरमहा होईल 50 हजारांची कमाई, अशी करा सुरुवात ऑनलाइन स्टोअरवर विक्री सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या बिझनेसला कंपनी म्हणून रजिस्टर करावं लागेल. तुम्‍ही तुमच्‍या व्‍यवसायाची MSME पोर्टलवर सूक्ष्म किंवा लघु उद्यम म्हणून नोंदणी करू शकता. यानंतर, तुम्हाला संबंधित विभागाकडून जीएसटी नंबरही घ्यावा लागेल. यानंतर, तुम्ही प्रोडक्टची ऑनलाइन लिस्टिंग करून सहजपणे विक्री करू शकता. Business Idea: तासभरात लागेल पुऱ्यांचा ढीग, या मशीनच्या मदतीने सुरु करा पाणीपुरीचा बिझनेस! सरकारही करेल मदत केंद्र सरकार प्रधान मंत्री मुद्रा योजनाअंतर्गत छोटे उद्योग आणि उद्योजकांना मदत करते. मुद्रा योजनाअंतर्गत तुम्ही बँकेकडून 50,000-10,00,000 रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता. बँकेकडून हे कर्ज तुम्हाला कोणत्याही तारण न देता दिले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या