JOIN US
मराठी बातम्या / मनी / Soybean Prices: पावसामुळे सोयाबीनवर संकट, किंमतीही घसरल्या काय कारण

Soybean Prices: पावसामुळे सोयाबीनवर संकट, किंमतीही घसरल्या काय कारण

पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं आहे. अनेक हेक्टर पिक पावसामुळे खराब झालं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस आहे. सप्टेंबर महिना उलटून गेल्यानंतर आता परतीचा पाऊस पडण्याऐवजी पावसानं तर धुमाकूळच चालू केला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आणि पिकांना मोठा फटका बसला आहे. आधीच वाढती महागाई आणि त्यामध्ये पावसामुळे झालेलं पिकांचं नुकसान यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं आहे. अनेक हेक्टर पिक पावसामुळे खराब झालं. अशी परिस्थिती असतानाही सोयाबीनचे दर बाजारात कोसळत आहेत. उस्मानाबादमध्ये परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाच नुकसान झाले आहे सोयाबीन पिकाची काढणी सुरू असताना जिल्यात गेली दोन दिवसापासून जिल्यातील आठ ही तालुक्यात परतीचा पाऊस पडत असून या पावसाचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकात पाणीच पाणी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा स्थितीतही सोयाबीनच्या किंमती का घसरत आहेत याचं कारण समजून घेऊया.

Home buying Tips: घर खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी तपासा, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये अवकाळी पावसामुळे सुमारे ०.३४ दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात सोयाबिनचं 12.14 मिलियन मेट्रिक टन उत्पादन होईल असा एक अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.६ टक्क्यांनी जास्त आहे. ३.२५ मिलियन मेट्रिक टन गेल्या वर्षीच्या सोयाबीनचा स्टॉक आहे. सोयाबीन अति प्रमाणात साठवून ठेवल्याने आता त्याचे दर उतरताना दिसत आहेत.

Diwali 2022 : फक्त 50 रुपयांत इथे मिळतोय आकाशकंदील, विश्वास बसत नाही पाहा VIDEO

संबंधित बातम्या

हळूहळू सोयाबीनचे भाव घसरत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आधीच पिकांचं नुकसान झाल्याने सोयाबीन कमी मिळणार आणि त्यातही चांगला भाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांसमोर पुढे अनेक प्रश्न आहेत. पावसामुळे नुकसान झालं तरी सोयाबीनचे दर काही चढतील याची शक्यता तज्ज्ञांना सध्या वाटत नाही. दिवाळीनंतर काय स्थिती असेल याकडे लक्ष असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या