JOIN US
मराठी बातम्या / मनी / Sovereign Gold Bond Scheme: लवकरच सुरु होतेय सरकारची खास स्किम, स्वस्तात सोनं खरेदी करायची मिळेल संधी!

Sovereign Gold Bond Scheme: लवकरच सुरु होतेय सरकारची खास स्किम, स्वस्तात सोनं खरेदी करायची मिळेल संधी!

Sovereign Gold Bond Scheme: तुम्हालाही स्वस्त सोने खरेदी करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कारण सॉवरेन गोल्ड बॉन्डची पहिली सिरीज ओपन होत आहे.

जाहिरात

सॉवरेन गोल्ड बाँड स्किम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Sovereign Gold Bond Scheme: तुम्हालाही स्वस्तात सोने घ्यायचे असेल, तर स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी रिझर्व्ह बँकेने आणली आहे. तुम्हाला सॉवरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत स्वस्त सोनं खरेदी करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सांगितलं की, सॉवरेन गोल्ड बाँड स्कीमच्या 2023-24 च्या पहिल्या सिरीजअंतर्गत 19 जून ते 23 जून दरम्यान स्वस्त सोने खरेदी करता येईल. यासोतबच, सॉवरेन गोल्ड बाँड स्किम 2023-24 ची दुसरी सिरीज सप्टेंबरमध्ये जारी केली जाईल. सॉवरेन गोल्ड बाँड स्किम म्हणजे नेमकं काय? सरकारने सुरू केलेला हा एक विशेष उपक्रम आहे. ज्या अंतर्गत बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करता येते. ही एक सरकारी समर्थित गोल्ड बाँड स्किम आहे. ज्यामध्ये गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी भारत सरकारकडून दिली जाते. ही बाँड योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली आहे.

किती सोनं खरेदी करु शकता? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या गाइडलाइननुसार, जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला किमान एक ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल. त्याच वेळी, 4 किलो वैयक्तिक, 4 किलो HUF आणि 20 किलो ट्रस्टच्या नावावर जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाऊ शकते. सोने कुठे खरेदी करता येईल SGB ​​सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पोस्ट ऑफिसमधून खरेदी केले जाऊ शकते. यासोबतच तुम्ही ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडमधून देखील खरेदी करू शकता.

जगभरातील महासागरांमध्ये तरंगतय 20 मिलियन टन सोनं; शास्त्रज्ञांचा दावा, किंमत जाणून विस्फारतील डोळे

संबंधित बातम्या

 व्याज किती मिळतं? यामध्ये खरेदी केलेले सोने तुम्ही सध्याच्या दरानेच विकू शकता. या योजनेची मॅच्योरिटी एकूण 8 वर्षांची आहे. ज्यामधून तुम्ही 5 व्या वर्षी त्यातून बाहेर पडू शकता. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना 2.50 टक्के व्याजदर दिला जातो. सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या