JOIN US
मराठी बातम्या / मनी / मेदांता कंपनीचा IPO घेताय? पैसे गुंतवण्याआधी Risk फॅक्टर समजून घ्या

मेदांता कंपनीचा IPO घेताय? पैसे गुंतवण्याआधी Risk फॅक्टर समजून घ्या

या कंपनीने 2,206 कोटी रुपयांचा IPO शेअर बाजारात आणला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: रिस्क घेतल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही असं म्हणतात. मेदांता ब्रॅण्ड अंतर्गत 3 ते 7 नोव्हेंबर रोजी IPO सुरू होणार आहे. या IPO मध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे आहेत. या कंपनीने 2,206 कोटी रुपयांचा IPO शेअर बाजारात आणला आहे. उत्तर आणि पूर्व भारतात पाच रुग्णालयांनी मिळून हा आणला आहे. या 3-4 वर्षांत बेडची क्षमता 40 टक्क्यांनी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कंपनीकडून 319-336 प्राइस बँड देण्यात आला आहे. 2 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 399 ते 336 रुपये निश्चित केले गेले आहे. 44 शेअर्सचा स्लॉट आहे. रिटेल गुंतवणूकदारांना 13 लॉटमध्ये गुंतवणूक करू शकता. 6 नोव्हेंबरपर्यंत कंपनीचं NSE आणि BSE ला लिस्टिंग होईल अशी अपेक्षा आहे. ही कंपनी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी शेअर बाजार-बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. कोटल महिंद्रा कॅपिटल कंपनी, क्रेडिट सुईस सिक्युरिटीज (इंडिया), जेफरीज इंडिया आणि जेएम फायनान्शिअल हे आयपीओमध्ये लीड मॅनेजर्स चालविणारे पुस्तक आहे. ग्लोबल हेल्थचा जीएमपी सध्या ३५ रुपये आहे. याचाच अर्थ लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 35 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. आयपीओसाठी इश्यू प्राइस प्रति शेअर 319-336 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही वरच्या किंमतीवर नजर टाकली तर स्टॉकची लिस्टिंग 371 रुपये असू शकते.

कंपनीने गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 2,205.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते. या काळात 196.2 कोटी रुपयांचा नफा झाला होता. आता या IPO मध्ये जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर पैसे भरण्याआधी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या