JOIN US
मराठी बातम्या / मनी / Share Market Updates: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी दिलासादायक सुरुवात

Share Market Updates: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी दिलासादायक सुरुवात

शेअर मार्केटमध्ये मंगळवारी सकाळी दिलासादायक सुरुवात झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : यूएस फेडच्या बैठकीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह आशिया बाजारपेठही घसरली होती. मात्र आता आज मंगळवारी सकाळी भारतीय शेअर मार्केट थोडं सावरताना दिसत आहे. मंगळवारी सकाळी दिलासादायक सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी आशेचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. ट्रॅव्हल शेअर्स, बँकिंग सेक्टरवर आज विशेष लक्ष राहणार आहे. गोल्डबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक आहे. त्यामुळे तिथे काय निर्णय होतो त्याकडेही लक्ष असेल. बाजारपेठेत आज थोडी स्थिरता आल्याचं दिसत आहे. 27 सप्टेंबर रोजी बाजाराची सुरुवात चांगली झाल. सेन्सेक्स 271.41 अंकांच्या वाढीसह 57,416.63 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 60.30 अंकांच्या मजबूतीसह 17100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

संबंधित बातम्या

तेलाच्या नव्या नियमांचा फायदा ओएनजीसीला होणार आहे. स्थानिक निविदांद्वारे तेलाच्या विक्रीवर जास्त किमती उपलब्ध होतील. ONGC ला प्रति BBL सरासरी रु.5-$8 ने जास्त किंमत मिळेल.

नव्या नियमानुसार ओएनजीसी लिलावाद्वारे तेल विकू शकणार आहे. यापूर्वी केवळ सरकारी रिफायनर्सना तेल विकण्याची परवानगी होती. ओएनजीसी, ऑइल इंडियाला कमी किमतीत तेल विकावे लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या