मुंबई, 7 फेब्रुवारी : शेअर बाजारातील आज आठवड्याचा पहिला दिवस गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक होता. बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) आज 1023.63 अंकांनी किंवा 1.75 टक्क्यांनी खाली येत 57621.19 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 302.70 अंकांच्या किंवा 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17213.60 अंकावर बंद झाला. आजच्या व्यवहारात मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला. BSE मिडकॅप इंडेक्स 1.25 टक्क्यांनी घसरून 24,441.84 वर बंद झाला. दुसरीकडे, स्मॉलकॅप इंडेक्स 0.75 टक्क्यांनी घसरून 29,480.13 वर बंद झाला. निफ्टी अर्थसंकल्पीय दिवसाच्या नीचांकाच्या खाली घसरला आहे. पॉवर सेक्टर वगळता बीएसईच्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये घसरण होत आहे. दरम्यान, मिडकॅप निर्देशांक आठवड्याच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. या 4 कारणांमुळे बाजारातील सेंटिमेंट्स बिघडले क्रूड ऑईलच्या किंमती 100 डॉलरच्या जवळ जागतिक पातळीवर कच्च्या तेलातील तेजी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज ब्रेंट आशियाई बाजारात प्रति बॅरल 94 डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात त्याची किंमत 14 टक्क्यांहून अधिक वाढली आहे आणि येत्या आठवड्यात ती 100 डॉलरवर जाऊ शकते. क्रूडमधील वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक आहे, कारण त्याचा ग्राहकांच्या मागणीवर परिणाम होतो आणि भारतीय रिझर्व्ह बँकेवर चलनविषयक धोरण कडक करण्यासाठी दबाव वाढतो. Investment Tips: गुंतवणुकीसाठी Voluntary Provident fund चांगला पर्याय, टॅक्स बचतीचाही फायदा अमेरिकेची पाच वेळा दर वाढवण्याची योजना यूएस पेरोल डेटा (Payroll Data) दाखवतो की गेल्या महिन्यात नोकऱ्यांमध्ये 4,67,000 ने वाढ झाली, ज्यामुळे केंद्रीय बँकेला दर वाढवण्यात मदत होऊ शकते. हा आकडा देखील महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात ओमिक्रॉन वेरिएंट खूप प्रभावित झाला होता. तसेच नोकऱ्यांचा हा आकडा अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूपच चांगला होता. अशा स्थितीत, मार्चच्या पतधोरण बैठकीत 50 बेसिस पॉईंट्सच्या वाढीच्या शक्यतेसह, यूएस फेडने यावर्षी पाच वेळा व्याजदर वाढवण्यावर ट्रेडर्स अंदाज लावत आहेत. FII ची सतत विक्री जागतिक क्रूडच्या किमतीतील तेजीप्रमाणेच विदेशी गुंतवणूकदारांकडून (foreign investors)) विक्रीचा दबाव आहे. 2022 मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारात 37,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अमेरिकेतील दर वाढीची अपेक्षा आणि इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराचे उच्च मूल्यांकन यामुळेही एफआयआयला विक्री करण्यास भाग पाडले जात आहे. LIC IPO : तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर स्वस्तात मिळणार शेअर टेक कंपन्यांमध्ये विक्री गेल्या वर्षी देशांतर्गत बाजारात तेजीचे मुख्य कारण माहिती तंत्रज्ञान (Infomation Technology) क्षेत्रातील कंपन्यांचे होते. आता 2022 मध्ये, या क्षेत्राची कामगिरी निराशाजनक आहे आणि निफ्टी आयटी निर्देशांक अलीकडील उच्चांकाच्या तुलनेत 10 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यापार करत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री तसेच जागतिक तंत्रज्ञान शेअरमधील विक्रीचा या क्षेत्राला दुहेरी फटका बसला आहे.