मुंबई, 5 फेब्रुवारी: भारतीय शेअर बाजारासाठी अर्थसंकल्पीय आठवडा फायदेशीर ठरला आहे. घसरणीतून सावरल्यानंतर बाजारात बुल्सचे वर्चस्व राहिले. बाजाराने अर्थसंकल्पीय आठवड्याची सुरुवात सकारात्मकतेने केली आणि पुढील दोन व्यापार सत्रांमध्ये त्यात वाढ झाली. मात्र, गेल्या दोन दिवसांत किंचित करेक्शन दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,444.59 अंकांनी म्हणजेच 2.52 टक्क्यांच्या वाढीसह 58,644.82 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 50 414.35 अंकांच्या किंवा 2.42 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,516.3 च्या पातळीवर बंद झाला. FII ची सततची विक्री, कमकुवत PMI डेटा, बॉन्ड यील्ड वाढणे, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, BoE द्वारे दर वाढ आणि ECB आर्थिक धोरण कडक करण्याचे संकेत यामुळे सेन्टिमेन्ट्स खराब झाले. BSE लार्जकॅप इंडेक्स 2.5 टक्क्यांनी वधारला बीएसई लार्जकॅप इंडेक्स 4 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 2.5 टक्क्यांनी वाढला. यामध्ये NMDC, Divis Laboratories, Vedanta, Tata Steel, Marico, Sun Pharmaceutical Industries, HCL Technologies, ITC आणि Hindalco Industries यांचा सर्वाधिक वाटा आहे. Godrej Properties च्या बोर्डाने DB Realty मधील गुंतवणूक योजना नाकारली, शेअरमधील पडझड थांबेल? दुसरीकडे, बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 2.3 टक्क्यांनी वधारला. यामध्ये Bharat Road Network, Jindal Drilling Industries, Ambika Cotton Mills, Elgi Equipments, MAS Financial Services, Nahar Poly यांनी सर्वाधिक योगदान दिले. या शेअरमध्ये 30-45 टक्क्यांची वाढ दिसून आली. या आठवड्यात मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठी वाढ त्याचप्रमाणे बीएसई मिडकॅप निर्देशांक 2.3 टक्क्यांनी वधारला. यामध्ये Jindal Steel & Power, Info Edge India, Canara Bank, TVS Motor Company, Steel Authority of India, PI Industries, Biocon, United Breweries आणि Torrent Power यांनी योगदान दिले. Tax Saving साठी उत्तम पर्याय आहे ELSS, तुमच्या गंतवणुकीवर किती फायदा मिळेल? बीएसई सेन्सेक्समध्ये, TCS ने या आठवड्यात मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठी वाढ पाहिली. त्यानंतर एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे एनटीपीसी, एम अँड एम आणि एचडीएफसीच्या मार्केट कॅपमध्ये सर्वात मोठी घसरण झाली. FII कडून 7,695.27 कोटी रुपयांची विक्री 4 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी मेटल निर्देशांक 6.6 टक्क्यांनी, निफ्टी फार्मा 4.6 टक्क्यांनी आणि एफएमसीजी निर्देशांक 3.6 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात विक्री सुरू आहे. 4 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात एफआयआयने 7,695.27 कोटी रुपयांची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 5,923.71 कोटी रुपयांची खरेदी केली. गेल्या आठवड्यात, साप्ताहिक आधारावर डॉलरच्या तुलनेत रुपया 35 टक्क्यांच्या वाढीसह 74.69 वर बंद झाला. तर 28 जानेवारीला तो 75.04 च्या पातळीवर बंद झाला होता.