मुंबई, 18 जानेवारी : शेअर बाजार (Share Market Today) मंगळवार, 18 जानेवारी रोजी खूपच घसरला. याला 2022 मधील सर्वात मोठी घसरण म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दुपारी एक वाजेपर्यंत शेअर बाजारात काही प्रमाणात वाढ किंवा घसरण होत होती, मात्र त्यानंतर बाजारातील जवळपास सर्वच निर्देशांक घसरायला लागले. सकाळपासून निफ्टी 50 वर दबाव दिसून आला. तो 1.07 टक्के म्हणजेच 195.10 अंकांच्या घसरणीसह 18113.00 वर बंद झाला. BSE सेन्सेक्स 0.90 टक्के किंवा 554.05 अंकांनी घसरला. 60754.86 वर बंद झाला. निफ्टी बँक (Bank Nifty) निर्देशांकाने दिवसभरात चांगली वाढ केली, पण तीही जवळपास कालच्या पातळीवर घसरली. निफ्टी बँक 0.02 टक्के किंवा 5.85 अंकांनी घसरून 38210.30 वर बंद झाला. EPFO : कोरोना संकटाना Umang App वरुन काढा पैसे; PF Advance चा फायदा घेण्यासाठी काय कराल? शेअर बाजारात घसरगुंडी का? खराब जागतिक संकेतांमुळे (Global Indications) भारतीय शेअर बाजारात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर 7 दिवसांच्या वाढीनंतर आज बाजारात प्रॉफिट बुकींगचा (Profit Booking) बोलबाला राहिला. आजच्या व्यवहारात मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. BSE मिडकॅप निर्देशांक 2.20 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक (Smallcap Index) 1.92 टक्क्यांनी घसरून बंद झाला. आज आयटी (IT), एफएमसीजी (FMCG), कॅपिटल गुड्स (Capital Goods) शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. मेटल, ऑटो, रियल्टी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली. निफ्टी 50 चे टॉप 5 गेनर शेअर
कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न निफ्टी 50 चे टॉप 5 लूजर