मुंबई: शेअर मार्केट मध्ये आज गुंतवणूकदारांची भरभराट झाली आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निफ्टी 38.30 अंकानी वधारला आहे. निफ्टी बँक आणि आयटी दोन्हीमध्ये पुलअप पाहायला मिळाला आहे. निफ्टी बँक 67.40 अंकानी वधारून 44,020.95 वर पोहोचला आहे. मिडकॅपमध्ये 169.00 अंकानी वधारून 32,836.30 वर पोहोचला आहे. ICICI बँक, रिलायन्सचे स्टॉक खाली आल्याचे दिसले आहेत. शेअर मार्केट बंद होताना आज व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 145 अंकांच्या वाढीसह 62,677 वर बंद झाला. तर निफ्टी 52 अंकांच्या मजबुतीसह 18,660 वर बंद झाला. आज बँके आणि आयटीच्या काही स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. बँक निफ्टीने आज नवा रेकॉर्ड केला आहे. 8 महिन्यात सर्वात जास्त चांदी महाग झाली आहे. तर 9 महिन्यात सोन्याने सर्वोच्च दर गाठला आहे. सोन्याचे दर 55 हजाराच्या जवळपास पोहोचतात का अशी चिंता निर्माण झाली आहे. टॉप गेनर्स वोडाफोन आयडिया- 8.65 आरबीएल बँक - 167.15 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स - 144.60 आयडिएफसी बँक - 62.70 बलरामपूर चीनी- 382.00 टॉप लूझर्स - कोलगेट पामोलिव - 1,571.50 पेज इंजस्ट्रिज 45,354.90 नेस्ले- 20,063.50 एचपीसीएल - 242.70 एबॉट इंडिया - 20,563.35
CNBC आवाजने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकी बाजाराचा टेक इंडेक्स नॅसडॅकमध्ये काल सुमारे 1% वाढ दिसून आली. आज त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील आयटी शेअर्सवरही झाला. एल अँड टी टेक, एलटीआय माइंडट्री हे आयटी शेअर्स सर्वात वेगवान होते. मिड-कॅप फायनान्शियल स्टॉक्समध्ये कारवाई झाली. आरबीएल 6%, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि सिटी युनियन बँक 4-4% वधारले.