JOIN US
मराठी बातम्या / मनी / Bloodbath in Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड, Sensex 1814 अंकांनी घसरला तर Nifty 500 अंकांनी खाली

Bloodbath in Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड, Sensex 1814 अंकांनी घसरला तर Nifty 500 अंकांनी खाली

शेअर बाजारात (Stock Market) गुरुवारी मोठी पडझड झाली आहे. सेंसेक्स आणि निफ्टीने वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीसह ट्रेडिंगची सुरुवात केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : शेअर बाजारात (Stock Market) गुरुवारी मोठी पडझड झाली आहे. सेंसेक्स आणि निफ्टीने वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीसह ट्रेडिंगची सुरुवात केली. रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे (Russia Ukraine Crisis) जागतिक बाजार दबाबाखाली आहे. मार्केट ओपनिंगमध्ये सेंसेक्स 1814 अंकानी खाली आला आणि 56 हजारहून खाली जात 55,418.45 वर ओपन झाला. तसंच निफ्टीदेखील 514 अंकांच्या नुकसानासह ट्रेडिंग सुरू करुन 17 हजारहून खाली 16,548.90 वर ओपन झाला. सेंसेक्स 1448 अंकांच्या नुकसानासह 55,743 वर ट्रेड करत आहे. तर निफ्टी 419 अंकानी घसरुन 16,444 वर ट्रेड करत आहे.

हे वाचा -  Gold Price Today: रशिया-युक्रेन युद्धाचा सोने दरावर मोठा परिणाम, आज भाव 51000 पार, पाहा लेटेस्ट रेट

सर्व सेक्टर्स लाल निशाण्यावर - बीएसई आणि एनएसई (BSE and NSE) वरही सर्व सेक्टर्समध्ये घसरण दिसते आहे. ऑटो, बँक, एसएमसीजी, तेल आणि गॅस, आयटी, उर्जा आणि रियल्टीचे स्टॉक 2 ते 4 टक्क्यांच्या नुकसानासह ट्रेडिंग आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपवर 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. निफ्टी बँकेच्या स्टॉक्समध्येही 4 टक्क्यांचं नुकसान दिसतं आहे.

हे वाचा -  लॉकडाउनमधील बिझनेस आयडियाला ‘शार्क टँक इंडिया’मधून मिळाली लाखोंची गुंतवणूक

आशियाई बाजारही नुकसानासह ओपन झाले - 24 फेब्रुवारी रोजी ओपन झालेल्या अधिकतर आशियाई बाजारांनी घसरणीसह ट्रेडिंग सुरू केलं. सिंगापूरचा स्टॉक एक्सचेंज 1.65 टक्के, तर जपानचा 1.12 टक्क्यांच्या नुकसानसह ओपन झाला. त्याशिवाय तायवानच्या स्टॉक एक्सचेंजवर 1.18 टक्के आणि दक्षिण कोरियामध्ये 1.72 टक्क्यांची घसरण झाली. आशियाई बाजारात आलेल्या घसरणीचा निश्चित परिणाम भारतीय गुंतवणुकदारांवर होणार असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या