**मुंबई,16 मार्च:**जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus)थैमान घातलं आहे. उद्योग- व्यवसायाबरोबरच शेअर बाजारावरही (Share Market) त्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अर्थात सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 2005 अंकांनी कोसळला असून तो 32,557 अंकावर स्थिरावला आहे. निफ्टीत सध्या 611 अंकांनी खाली आला आहे. भारतात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी बाजारात जोरदार विक्री केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 2005 अंकांनी कोसळला. निफ्टीत 611 अकांहून अधिक घसरण झाली. यात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच आशियाई बाजारात पुन्हा एकदा पडझड झाली. याव्यतिरिक्त हाँगकाँग, शाँघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी चांगलेच गडगडले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यातही शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सुरूवातीच्या कारभारात सेन्सेक्स 3100 अंकांनी घसरला होता. एवढ्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार 45 मिनिटांसाठी ठप्प होता. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,325.34 अंकांनी वधारला असून, 34103.48 वर मार्केट बंद झालं. तर निफ्टी 433.55 अंकांनी वाढून 10023.70 वर बंद झाला होता. हेही वाचा.. LIC ने लाँच केल्या 2 नवीन योजना, जाणून घ्या कशी कराल फायदेशीर गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी गेला शुक्रवार ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. 3100 हून जास्त अंकांनी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचं जवळपास 12 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. निर्देशांक 30 हजारांच्या खाली गेल्यानं शेअर बाजाराला सर्किट लागल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर निर्देशांक नियंत्रणाबाहेर गेल्याने शेअर बाजारातील ट्रेडिंग (Trading) थांबविण्यात आलं होतं. काल सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी आणि निफ्टी (Nifty) तब्बल 700 अंकांनी घसरला होता. एस्कोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी न्यूज18 हिंदीशी बोलताना सांगितलं की, अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक Dow Futures गुरूवारी कोसळला होता, मात्र शुक्रवारी त्याची खरेदी वाढली होती. डाओ फ्यूचर्स 455 अंकांनी वाढून 21,560 वर पोहोचला आहे. गुरुवारी रात्री अमेरिकेबरोबरच जगभरातील सर्व शेअर बाजारात 1987 नंतरची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. आसिफ यांच्या म्हणण्यानुसार शेअर मार्केट पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार लवकरच मोठी पावलं उचलण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. कोरोनाचं संकट वाढतंय! जाणून घ्या, तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून यासाठी मेडिकल क्लेम मिळणार का? सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दुसरीकडे, गेल्या आठवड्याभरामध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत होणारे बदल आणि त्याचप्रमाणे कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे ढासळणारी जागतिक अर्थव्यवस्था यामुळे सोन्याच्या किंमतीवर मोठा परिणाम होत आहे. जागतिक स्तरावर बाजारातील उलाढालीच्या परिणामामुळे सोनं स्वस्त झालं. मुख्यत: गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत जवळपास 3000 रुपयांनी कमी झाली आहे. प्रति तोळा 44 हजारांच्या वर असणारी सोन्याची किंमत प्रति तोळा 41 हजारांच्या घरात पोहोचली आहे.