मुंबई : तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी जर उत्तम गुंवणुकीचा पर्याय शोधत असाल तर हा पर्याय उत्तम आहे. एवढच नाही तर वयोवृद्धांसाठी देखील ही योजना सर्वोत्तम असल्याचं सांगितलं जात आहे. एससीएसएस नावाची ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांना वर्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं. या योजनेत सध्या ७.४ टक्के दराने व्याज मिळणार आहे. बचत खात्यावरील मिळणाऱ्या व्याजापेक्षा हे जास्त आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही महागाईच्या दृष्टीने अतिशय चांगली योजना आहे. त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही योजना रिटायरमेंटनंतर उत्तम रिटर्न देते. पोस्ट ऑफिसमध्ये चालवण्यात येणारी ही योजना अनेक प्रकारे फायदे देणार आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ही योजना सरकारी आहे त्यामुळे यामध्ये पैसे बुडण्याचा धोका नाही. यामध्ये पैसे गुंतवणं जोखमीचं नाही. ही योजना पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला तिथे जाऊन अर्ज करावा लागेल. याचा परतावा तुम्हाला वर्षाला २ लाख किंवा त्यापेक्षा जास्तही मिळू शकतो. हे वाचा- Post Office : पोस्टच्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपये गुंतवाल तर करोडपती व्हाल! ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही नागरिक SCSS योजना उघडू शकतो. खाते उघडताना, 1000 रुपयांच्या पटीत पैसे जमा करावे लागतील आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येऊ शकतात. या योजनेचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा असतो. सध्याच्या 7.4 टक्क्यांनुसार, एखाद्या व्यक्तीने SCSS मध्ये 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये गुंतवले. ह्या योजनेसाठी सेविंग स्कीम जॉइंट डिरॉझिट किंवा जॉईंट खात्यावरूनही पैसे गुंतवता येऊ शकतात. आपल्या पत्नीसोबत पोस्टातील खात्यावर ही योजना सुरू करता येऊ शकते. पत्नी-पत्नी दोघांच्या नावे जर प्रत्येकी १५ लाख रुपये ठेवले तर एकूण रक्कम ३० लाख होईल. १५ लाख रुपयांच्या ठेवीवर ७.४ टक्के व्याज दराने या योजनेत तिमाहीमध्ये पहिलं व्याज २७ हजार ७५० रुपये मिळणार आहे. तर वार्षिक व्याज एक लाख ११ हजार रुपये मिळेल. दोघांचं जॉईंट अकाऊंट असेल आणि रक्कम ३० लाख ठेवली तर त्यावर २ लाख २२ हजार रुपये वार्षिक व्याजदर मिळू शकतं. हे वाचा-Money Mantra: तुमच्या कॉन्टॅक्टसमुळे आज होईल फायदाच फायदा; ‘या’ राशी होणार मालामाल मॅच्युरिटीवर खातेदाराला एकूण ₹5,55,000 व्याजाची रक्कम मिळेल. प्रिंसिपलसकट ही रक्कम 20,55,000 लाख रुपयांपर्यंत जाते. 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर या दरम्यान जर तुम्ही योजना सुरू केली असेल तर तुम्हाला त्याचा फायजदा जास्त होणार आहे. भारत सरकारकडून अल्पबचत योजनांवरील व्याजदर तिमाही आधारावर सुधारित केले जातात या व्यतिरिक्त, 5 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे लॉक इन केले जातात. या योजनेअंतर्गत तुम्ही जर गुंतवणूक केली तर 1961 आयकर कायद्याच्या कलम 80C द्वारे प्रदान केलेल्या कर कपातीसाठी पात्र आहेत. SCSS खात्यांमधून मिळालेल्या व्याजावर एका ठरावीक रकमेनंतर आर्थिक वर्षात 50,000 हजारांपर्यंत सूटही मिळते. जर फॉर्म 15 G/15H सबमिट केला असेल आणि जमा केलेले व्याज उत्पन्न अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर खातेदाराला कोणताही TDS लागू केला जाणार नाही. खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनंतर, SCSS खाते बंद केले जाऊ शकते, खातेधारक मॅच्युरिटीच्या तारखेपासून अतिरिक्त तीन वर्षे खातं सुरू ठेवू शकतात. पैसे न काढता खातं सुरू ठेवलं तर त्यावर पुन्हा ७.४ टक्के रेट ऑफ इंटरेस्ट मिळू शकतो. मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता. जर तुम्ही एक वर्षाच्या आत पैसे काढले तर तुम्हाला तेवढा इंटरेस्ट मिळणार नाही. जर दोन वर्षांतर तुम्ही पैसे काढले तर १.५ टक्के रक्कम कापली जाईल. तर पाच वर्षांच्या आत मुदतीपूर्वी खातं बंद केलं तर एक टक्के रक्कम कापली जाणार आहे. जर पाच वर्ष पूर्ण झाली आणि तुम्ही मुदतवाढीची माहिती दिली नाहीत तर एक वर्षात तुमचं खातं बंद केलं जाऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासूनच गुंतवणूक करा आणि गुंतवलेले पैसे काढा.