JOIN US
मराठी बातम्या / मनी / हे तर बेस्ट झालं की! पेन्शनर्सना SBI ने दिली आणखी एक खास सुविधा

हे तर बेस्ट झालं की! पेन्शनर्सना SBI ने दिली आणखी एक खास सुविधा

सारखं बँकेच्या फेऱ्या होऊ नयेत यासाठी SBI ने पेन्शनधारकांसाठी खास सुविधा आणल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : नोव्हेंबर महिना हा पेन्शनधारकांसाठी स र्वात महत्त्वाचा मानला जातो. या कालावधीमध्ये लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यापासून पेन्शन स्लिप घेण्यापर्यंतची अनेक कामं त्यांना करायची असतात. अशावेळी सारखं बँकेच्या फेऱ्या होऊ नयेत यासाठी SBI ने पेन्शनधारकांसाठी खास सुविधा आणल्या आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने पेन्शनर्सना मोठा दिलासा देणारी नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पेन्शनधारकांना आता त्यांची पेन्शन स्लिप व्हॉट्सअॅपवर व्हॉट्सअॅप वर मिळणार आहे. त्याची पद्धत अतिशय सोपी आहे. याशिवाय एसबीआय व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना बॅलन्स इन्क्वायरी आणि मिनी स्टेटमेंटही मिळू शकते. एसबीआयने ट्विट करून दिली माहिती एसबीआयने व्हॉट्सअॅप सेवेअंतर्गत व्हॉट्सअॅपवर पेन्शन स्लिप मिळण्याच्या सुविधेची माहिती ट्विट पोस्टद्वारे दिली आहे. ही नवी सेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले आहे की, “आता व्हॉट्सअॅपवर आपली पेन्शन स्लिप मिळवा.

संबंधित बातम्या

बँकेच्या म्हणण्यानुसार, पेन्शन स्लिप मिळवण्यासाठी युजर्सना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे 9022690226 फक्त हाय पाठवावे लागणार आहे. एसबीआय व्हॉट्सअॅप सेवेद्वारे बँक खाते थकबाकी शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट सारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

आपल्या व्हॉट्सअ ॅपद्वारे 9022690226 क्रमांकावर हाय पाठवा. आता तुम्हाला बँकेकडून तीन पर्यायांसह मेसेज येईल. या मेसेजमध्ये बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिपचे पर्याय मिळतील. पेन्शन स्लिपवर टॅप करा आणि ज्या महिन्याची स्लिप आवश्यक आहे. तुम्हाला वेटिंग मेसेज मिळेल आणि थोड्या वेळात पेन्शन स्लिप मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या