एसबीआय सॅलरी अकाउंट
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पगार ज्या खात्यात येतो त्याला सॅलरी अकाउंट असं म्हणतात. हे रेग्यूलर सेविंग अकाउंटपेक्षा खूप वेगळे आहे आणि यामध्ये बँक अनेक अतिरिक्त फायदे देते. ज्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंटची माहिती देत आहोत. स्टेट बँक ही कॉर्पोरेट, सरकारी, हॉस्पिटल, हॉटेल इत्यादी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सॅलरी अकाउंटवर समान लाभ देते. तुम्हालाही स्टेट बँकेत सॅलरी अकाउंट उघडायचे असेल तर सर्वप्रथम या खात्यावर उपलब्ध असलेल्या खास सुविधांविषयी जाणून घ्या…
जुनं सॅलरी अकाउंट बंद करायचंय? अवश्य जाणून घ्या ‘या’ गोष्टी-स्टेट बँक आपल्या सॅलरी अकाउंट होल्डर्सला अनेक सुविधा पुरवते. -तुम्हाला SBI च्या सॅलरी अकाउंटमध्ये झिरो बॅलन्सची सुविधा मिळते. -या खात्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मासिक शुल्क भरावे लागणार नाही. -या अकाउंटमध्ये तुम्हाला ऑटो स्वीपची सुविधा मिळते. -तुम्ही तुमच्या गरजेनुसार एटीएमद्वारे व्यवहार करू शकता. -डिमांड ड्राफ्ट जारी करण्यासाठी तुम्हाला शुल्कात सूट मिळते. -या खात्यावर अकाउंट होल्डर्सला अॅक्सीडेंटल विमा मिळतो. -कार लोन, पर्सनल लोन, होम लोन यावरील व्याजदरावर रिबेट उपलब्ध आहे. -बँकेत लॉकर घेण्यासाठी वार्षिक फीमध्ये सूट उपलब्ध आहे. -खात्यात येणाऱ्या पगारानुसार ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे.
-आधार कार्ड (Aadhaar Card) -पॅन कार्ड (PAN Card) -पासपोर्ट साइज फोटो (2 फोटो) -सॅलरी स्लिप (Salary Slip) -अॅड्रेस प्रूफसाठी वीज बिल किंवा पाण्याचे बिल वापरु शकता. -जॉइंट अकाउंटसाठी व्यक्तीचे आधार आणि पॅन कार्ड तुमचे सॅलरी अकाउंट आहे? मग SBI च्या ‘या’ स्किमविषयी वाचाच
स्टेट बँकेत सॅलरी अकाउंट उघडल्यानंतर, खात्यात तीन महिन्यांपर्यंत पगार जमा झाला नाही तर अशा वेळ बँक सॅलरी अकाउंटचे रुपांतर रेग्यूलर सेविंग अकाउंटमध्ये करते. यानंतर सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या सर्व सुविधा तुमच्याकडून काढून घेतल्या जातील.