JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, हेलपाटे घालण्याची गरज नाही; बँकेनं सुरू केलीय खास सेवा

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, हेलपाटे घालण्याची गरज नाही; बँकेनं सुरू केलीय खास सेवा

बँकेनं ग्राहकांना आता घरबसल्या सेवा द्यायला सुरू केल्यानं ग्राहकांचे बँकेतील हेलपाटे घालण्याचे कष्ट वाचले आहेत.

जाहिरात

SBI ने ग्राहकांसाठी सुरू केलीय खास सेवा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : SBI ने खासगी बँकांसारखंच ग्राहकांची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या ग्राहकांसाठी खास सेवा सुरू केली आहे. बँकेनं ग्राहकांना आता घरबसल्या सेवा द्यायला सुरू केल्यानं ग्राहकांचे बँकेतील हेलपाटे घालण्याचे कष्ट वाचले आहेत. देशात बँकिंगशी संबंधित अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामुळे बँकेतील ताणही आणि गर्दी कमी झाली आहे. तुमच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटसाठी आता बँकेत जावं लागणार नाही. तुम्हाला ते ऑनलाईन मिळू शकणार आहे. बँकेने ही सेवा पूर्णपणे ऑनलाइन केली आहे.

SBI च्या या स्किमवर मिळतंय बंपर व्याज! एकदा पैसे लावा मग दरमहा घरबसल्या होईल कमाई

आता तुम्हाला तुमचे अकाउंट स्टेटमेंट हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. यासाठी बँकेने फोन नंबर दिले आहेत. त्यावर तुम्ही फोन करून त्यांना तुमचा Email ID द्यायचा आहे. त्यावर तुम्हाला खात्याचं स्टेटमेंट दिलं जाणार आहे.

यासाठी बँकेने टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. तुम्ही कोणत्याही टोल फ्री क्रमांक 1800 1234 किंवा 1800 2100 वर कॉल करू शकता. कॉल केल्यानंतर, तुम्हाला खात्यावरील शिल्लक रक्कम आणि तुम्ही व्यवहार केलेली रक्कम जाणून घेण्यासाठी 1 नंबर टाइप करावा लागेल. तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे ४ अंक अपलोड करावे लागतील.

Best FD Rates : 399 दिवस पैसे गुंतवा आणि जबरदस्त रिटर्न मिळवा, ही बँक देते बेस्ट ऑफर

संबंधित बातम्या

तुम्हाला बँक खात्याचं स्टेटमेंट काढायचं असेल तर 2 टाइप करा. त्यानंतर तुम्हाला किती कालावधीचं स्टेटमेंट निवडायचं आहे त्याची माहिती द्या आणि तुम्हाला मेसेज किंवा इमेलवर स्टेटमेंट येईल. याशिवाय तुम्ही SBI च्या Whattsapp सेवेचाही लाभ घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या