JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार, काय आहे कारण?

SBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार, काय आहे कारण?

SBI द्वारे वितरित केलेल्या कर्जांपैकी सर्वात मोठा हिस्सा (53.1 टक्के) MCLR संबंधित कर्जांचा आहे. अलीकडेच, बँकेने 2 कोटी रुपयांच्या एफडीवरील व्याजदरात 40-90 बेसिक पॉइंट्सने वाढ केली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मे : भारतातील सर्वात मोठी बँक SBI ने पुन्हा एकदा MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट) वाढवले ​​आहे. नवीन दर 15 मे म्हणजेच रविवारपासून लागू झाले आहेत. या महिन्यात बँकेने MCLR मध्ये केलेली ही दुसरी वाढ आहे. बँकेने प्रत्येक कार्यकाळासाठी 10 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्के वाढ केली आहे. SBI चा एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR आता 6.75 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्के झाला आहे. 6 महिन्यांसाठी MCLR 7.15 टक्के, एका वर्षासाठी 7.20 टक्के, 2 वर्षांसाठी 7.40 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.50 टक्के झाला आहे. सरकारकडून पती-पत्नी दोघांना मिळतोय 10 हजारांचा लाभ; ‘या’ योजनेचा फायदा घ्या काय परिणाम होईल? MCLR वाढल्याने, ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या (SBI Loan) मासिक EMI मध्ये वाढ होईल. तसेच, नवीन ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल. आरबीआयने रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने 40 बेसिस पॉइंटने वाढ केली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आरबीआय व्याजदर आणखी वाढवू शकते, ज्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे अधिक महाग होईल. SBI द्वारे वितरित केलेल्या कर्जांपैकी सर्वात मोठा हिस्सा (53.1 टक्के) MCLR संबंधित कर्जांचा आहे. अलीकडेच, बँकेने 2 कोटी रुपयांच्या एफडीवरील व्याजदरात 40-90 बेसिक पॉइंट्सने वाढ केली होती. Investment Tips: तीन वर्षाच्या मुलाच्या नावे PPF खातं सुरु करा; 15 वर्षात 32 लाख जमा होतील या वाढीमुळे बँकेच्या मार्जिनवर सकारात्मक परिणाम होईल, असे एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी म्हटले आहे कारण बहुतांश कर्जे सतत बदलणाऱ्या दरांवर आधारित असतात. याचा अर्थ रेपो दरात बदल होताच हे देखील बदलले जातील. MCLR म्हणजे काय? MCLR कर्ज दर हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा अंतर्गत बेंचमार्क किंवा संदर्भ दर असतो. हे कोणत्याही कर्जाचे किमान व्याज दर निश्चित करते. 2016 मध्ये RBI ने MCLR चा भारतीय वित्तीय व्यवस्थेत समावेश केला होता. यापूर्वी 2010 मध्ये लागू करण्यात आलेल्या बेस रेट प्रणालीअंतर्गत व्याज निश्चित करण्यात आले होते. MCLR लागू झाल्यानंतर ते बंद करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या