JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI vs Post Office FD: एसबीआय की पोस्ट ऑफिस? कुठे एफडी केली तर होईल जास्त फायदा?

SBI vs Post Office FD: एसबीआय की पोस्ट ऑफिस? कुठे एफडी केली तर होईल जास्त फायदा?

SBI vs Post Office FD: तुम्हीही अशा लोकांमधून आहात जे Fixed Deposit Scheme वर जास्त विश्वास करतात. तर आज आपण SBI Fixed Deposit चे व्याज दर आणि Post Office FD च्या व्याजदरांविषयी जाणून घेणार आहोत.

जाहिरात

फिक्स्ड डिपॉझिट स्किम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

SBI vs Post Office FD: गुंतवणुकीचे अनेक पर्याय असूनही, आजही एक मोठा वर्ग गॅरंटीड रिटर्न देणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट स्किमवर विश्वास ठेवतात. लोक सहसा बँकेत एफडी करून घेतात. पण हा ऑप्शन तुम्हाला बँकेसोबतच पोस्ट ऑफिसमध्येही मिळतो. याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिस एफडी म्हणतात. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 किंवा 5 वर्षांसाठी FD करू शकता. बँकेप्रमाणेच, पोस्ट ऑफिसमधील व्याजदर देखील टाइम पीरियडनुसार बदलतात. जर तुम्ही SBI मध्ये FD केली तर तुम्हाला तिथे FD वर किती नफा मिळेल आणि तीच FD तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये केली तर तुम्हाला किती नफा मिळू शकतो. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

सर्वप्रथम, SBI विषयी जाणून घेऊया. येथे तुम्ही जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी FD करु शकता आणि व्याजदर देखील वर्षानुसार वेगवेगळे आहेत. SBI मध्ये सर्वात कमी कालावधीची FD 7 दिवसांपासून 45 दिवसांपर्यंत असते. यामध्ये तुम्हाला 3% व्याज मिळते आणि वृद्धांना 3.50% व्याज मिळते. 46 दिवस ते 179 दिवसपर्यंत 4.50% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.00%. 180 दिवस ते 210 दिवस 5.25% आणि ज्येष्ठांसाठी 5.75%, 211 दिवसांपेक्षा जास्त परंतु 1 वर्षापेक्षा कमी FD साठी 5.75% आणि वृद्धांना FD वर 6.25% व्याज मिळते. Real Estate Auction: ‘ही’ सरकारी बँक देतेय कमी पैशात घर आणि दुकान खरेदीची संधी! असा करा अर्ज 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी वेळेसाठी सामान्यांसाठी 6.80% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30% व्याज दिले जाते. 2 वर्षांवरील परंतु 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50% व्याजदर आहे. याशिवाय, 3 वर्षे ते 10 वर्षांच्या एफडीसाठी, बँक सध्या सर्वसामान्यांना 6.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.00% व्याज देते. पोस्ट ऑफिस एफडी आता पोस्ट ऑफिस एफडीबद्दल बोलूया. येथे 1, 2, 3 किंवा 5 वर्षांसाठी FD करता येते. व्याजदर सर्व श्रेणीतील लोकांसाठी समान आहे. सध्या, 1 वर्षापर्यंतच्या एफडीवर 6.90% दराने व्याज मिळत आहे. तुम्ही दोन वर्षे किंवा तीन वर्षांपर्यंत FD केली तर तुम्हाला 7.00% दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, 5 वर्षांत 7.50% दराने व्याज मिळेल. SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! थेट खिशावर होणार परिणाम किती वर्षांसाठी एफडी घेतल्यावर नफा कुठे आहे? -अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस आणि एसबीआयच्या व्याजदरांची तुलना केली तर, एसबीआयमध्ये तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.80% दराने व्याज मिळत आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्षापर्यंतच्या FD वर 6.90% दराने व्याज दिलं जातंय. -तुम्ही दोन ते तीन वर्षांसाठी FD केली तर सामान्य व्यक्तीला पोस्ट ऑफिस आणि SBI या दोन्ही ठिकाणी समान दराने म्हणजे 7.00% व्याज मिळेल. मात्र ज्येष्ठ नागरिकांना SBI मध्ये 7.50% दराने व्याज मिळेल. -तुम्हाला 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एफडी करायची असेल तर पोस्ट ऑफिस जास्त फायदेशीर आहे. येथे 7.50% नुसार, सर्व श्रेणीतील लोकांना व्याज दिले जाईल. दुसरीकडे, SBI मध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर, सामान्य व्यक्तीला 6.50% व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.00% व्याज मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या