JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI कडून अलर्ट! नव्या वर्षात बदलणार क्रेडिट कार्डचे नियम

SBI कडून अलर्ट! नव्या वर्षात बदलणार क्रेडिट कार्डचे नियम

नव्या वर्षाआधीच क्रेडिट कार्डचे हे नियम तुम्ही जाणून घ्या. ज्यामुळे नुकसान होणार नाही.

जाहिरात

Credit Card: सणासुदीच्या काळात ‘या’ 5 बँकांच्या क्रेडिट कार्डधारकांची होणार चंगळ, स्वस्तात खरेदी करता येतील अनेक वस्तू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : तुम्ही जर SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. क्रेडिट कार्डचे नव्या वर्षात नियम बदलणार आहेत. हे बदलणारे नियम जर तुम्हाला माहिती नसतील तर तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नव्या वर्षाआधीच क्रेडिट कार्डचे हे नियम तुम्ही जाणून घ्या. ज्यामुळे नुकसान होणार नाही. 2022 हे वर्ष संपायला आता फक्त काही दिवस उरले आहेत. नवीन वर्ष सुरू होताच अनेक मोठे बदल देखील होणार आहेत. एचडीएफसी बँक आणि एसबीआयने कार्डधारकांसाठी क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केला आहे. एसबीआय क्रेडिट कार्डचे नियम 1 जानेवारीपासून बदलणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स अॅण्ड पेमेंट सर्व्हिसेसने आपल्या सिम्पलीक्लिक कार्डधारकांसाठी काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. ही माहिती कंपनीने वेबसाईटवर दिली आहे.

SBI ने सीनियर सिटीजनसाठी आणलीय खास योजना, चुटकीसरशी होणार काम

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारी 2023 रोजी व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉईंट्स रिडेम करण्याच्या दोन नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. हा नियम 6 जानेवारीपासून लागू होणार आहे. SBI Cards & Payment Services ने दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारी 2023 रोजी, सिम्पलीक्लिक कार्डधारकांना जारी केलेले क्लिअरट्रिप व्हाउचरचा वापर एकाच व्यवहारात रिडेम करता येणार आहे. इतर कोणत्याही ऑफर / व्हाउचरसोबत तो जोडता येणार नाही.

Loan घेताय थांबा! Flat lendingआणि Reducing Interest Rate मधील फरक समजून घ्या

संबंधित बातम्या

1 जानेवारीपासून SimplyCLICK/SimplyCLICK सोबत ऑनलाईन खर्च आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम देखील बदलणार आहेत. इथे 10 ऐवजी आता 5 पट रिवॉर्ड पॉईंट्स दिले जाणार आहे.

अपोलो 24X7, BookMyShow, क्लियरट्रिप, इजीडायनर, लेंसकार्ट आणि नेटमेड्सवर 10 तुम्हाला 10 पट रिवॉर्ड पॉईंट मिळतील अशी माहिती देण्यात आली आहे. 15 नोव्हेंबर 2022 पासून एसबीआय कार्डने ईएमआय व्यवहारांवर सुधारित शुल्क आणि भाड्यासाठी क्रेडिट चार्जेस वापरल्यावर नवीन शुल्क लागू करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या