JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI च्या या योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 10000, वाचा काय आहे ही BEST बचत योजना

SBI च्या या योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 10000, वाचा काय आहे ही BEST बचत योजना

तुम्ही जर सुनिश्चित रिटर्न मिळण्याच्या विचारात असाल, तर एसबीआय (SBI) काही चांगल्या योजना देऊ करते. SBI फिक्स्ड डिपॉझिट (FD) पासून पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF) पर्यंत सेव्हिंगचा पर्याय देत आहे. काही योजनांमधून तुम्ही दरमहा 10000 रुपये मिळवू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी: कोणतीही व्यक्ती त्याची कमाई अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिते ज्याठिकाणी त्याचे पैसे सुरक्षित राहतील आणि एक प्रकारे निश्चित रिटर्न देखील मिळेल. मात्र अनेकदा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे रिटर्न कमी समस्या अधिक अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. एसबीआय अशा काही चांगला कमी बचत योजना  ग्राहकांसाठी देत आहे. या योजनांमधून तुम्हाला ठराविक कालावधीनंतर निश्चित रिटर्न मिळेल. जाणून घ्या काय आहेत या योजना देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) तुमचे पैसे सुरक्षित राहावेत याकरता एक सुरक्षित पर्याय आहे.  SBI फिक्स्ड डिपॉझिट (FD) पासून पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF) पर्यंत सेव्हिंगचा पर्याय देत आहे. काही योजनांमधून तुम्ही दरमहा 10000 रुपये मिळवू शकता. SBI अ‍ॅन्युटी स्कीम एसबीआयच्या या स्कीममध्ये 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांच्या अवधीसाठी गुंतवणूक करता येईल. याकरता संबंधित कालावधीसाठी टर्म डिपॉझिटवर असणारा व्याजदरच या योजनेसाठी असेल. उदाहरणार्थ जर तुम्ही पाच वर्षांसाठी फंड डिपॉझिट केला असेल, तर या पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटवर जेवढे व्याज मिळते आहे त्याच दराने तुम्हाला या योजनेत व्याज मिळेल.  या योजनेचा फायदा कुणीही घेऊ शकतं. अशाप्रकारे मिळतील दरमहा 10,000 या योजनेमध्ये जर तुम्हाला दरमहा 10,000 रुपयांची कमाई करायची असेल तर तुम्हाला यात 5,07,964 रुपये जमा करावे लागतील. जमा राशीवर तुम्हाला 7 टक्के व्याजदराने रिटर्न मिळेल. जर तुमच्याकडे पाच लाख रुपये आहेत आणि तुम्हाला ते एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवायचे आहेत, तर ही योजना उत्तम आहे. (हे वाचा- पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर, या शहरात पेट्रोलचे दर शंभरी पार) एसबीआयच्या अ‍ॅन्युटी स्कीममध्ये कमीतकमी 1000 रुपये अ‍ॅन्युटी मिळवण्यासाठी रक्कम जमा करता येते. यामध्ये जास्तीतजास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही आहे. अ‍ॅन्युटी पेमेंटमध्य ग्राहकांनी जमा केलेल्या रकमेवर निश्चित कालावधीनंतर व्याज मिळण्यास सुरुवात होते. ही योजना भविष्यासाठी खूप चांगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या