JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI मध्ये अकाउंट नाही, तरीही YONO अ‍ॅपद्वारे करु शकता UPI पेमेंट, पाहा प्रोसेस!

SBI मध्ये अकाउंट नाही, तरीही YONO अ‍ॅपद्वारे करु शकता UPI पेमेंट, पाहा प्रोसेस!

SBI YONO App UPI Service For All: एसबीआयने नुकतेच कोणत्याही बँकेच्या कस्टमर्ससाठी यूपीआय पेमेंटसाठी आपल्या योनो अ‍ॅपचा वापर करण्याची मंजूरी दिली आहे.

जाहिरात

योनो अ‍ॅप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 जुलै : नुकतेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या डिजिटल बँकिंग अ‍ॅप योनोचे नवीन व्हर्जन लॉन्च केलेय. आता एसबीआयने कोणत्याही बँक ग्राहकांना यूनायटेड पेमेंट इंटरफेस पेमेंटसाठी आपल्या योनो अ‍ॅपचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच योनो अ‍ॅपवर यूपीआय सुविधेचा वापर करण्यासाठी एसबीआयमध्ये बँक अकाउंटची गरज असणार नाही. SBI ने एक निवेदन जारी केले आहे की, प्रत्येक भारतीयासाठी ‘YONO’ सह, आता कोणताही बँक ग्राहक YONO च्या नवीन व्हर्जनमध्ये स्कॅन, पेमेंट आणि आपल्या कॉन्टॅक्टस्मध्ये पैसे पाठवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया ही सुविधा कशी काम करते. SBI आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार ‘ही’ खास सुविधा कशी काम करेल ही सर्व्हिस -सर्वात पहिले तुम्हाला योनो अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोर आणि आयफोन अ‍ॅप स्टोर दोन्हींवर उपलब्ध आहे. -आता योनो अ‍ॅप ओपन करा. -तुमच्या समोर New To SBI चा पर्याय दिसेल. -यानंतर Register Now चा पर्याय दिसेल. -तुम्ही SBI चे ग्राहक नसल्यास तुम्हाला Register Now वर क्लिक करावे लागेल. -पुढच्या पेजवर Register to Make UPI Payments चा पर्याय येईल. या सर्व्हिसचा वापर करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवा. -आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक असलेले सिम निवडावे लागेल. -मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी नंबरवर एसएमएस पाठवला जाईल. -मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर, UPI आयडी तयार करण्यासाठी बँक सेलेक्ट करावी लागेल. -आता तुम्हाला एक मॅसेज मिळेल ज्यामध्ये लिहिलेलं असेल की, your registration for SBI Pay has started. If it’s not you, please report it to your bank immediately. -तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर तुमच्या स्क्रीनच्या टॉपवर पाहू शकता. आता तुम्हाला SBI UPI हँडल तयार करावे लागेल. -SBI तुम्हाला 3 UPI आयडी ऑप्शन देईल ज्यापैकी तुम्ही एक निवडू शकता. -UPI आयडी निवडल्यानंतर, तुम्हाला “You have successfully created an SBI UPI handle.” असा मॅसेज मिळेल. -आता तुम्हाला 6 डिजिटचा एक MPIN सेट करावा लागेल. -MPIN सेट केल्यानंतर, तुम्ही UPI पेमेंट करण्यासाठी YONO अ‍ॅप वापरणे सुरू करू शकता. Home Loan घेण्याचा विचार करताय? या 5 बँका देताय सर्वात स्वस्त गृहकर्ज

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या