JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या या निर्णयामुळे तुमचा खिसा होणार रिकामा

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या या निर्णयामुळे तुमचा खिसा होणार रिकामा

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेनं जारी केल्या नव्या गाइडलाईन्स

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही जर ही सेवा घेतली असेल तर तुमच्या खिशाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. SBI मध्ये ज्या ग्राहकांना लॉकर सेवा घेतली आहे त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेत लॉकर असलेल्या ग्राहकांसाठी विशेष सूचना बँकेकडून जारी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सूचनांचे पालन करण्यासाठी, SBI ने सर्व लॉकर धारकांना त्यांच्या संबंधित बँक शाखेला भेट देण्याचं आवाहन केलं आहे. नवीन लॉकर करारावर लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकेकडून एका ट्विटद्वारे ही घोषणा करण्यात आली असून, ग्राहकांनी नवीन करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ती आवश्य वाचावी असंही म्हटलं आहे.

SBI Home Loan: SBI चा मोठा झटका! दणकून वाढवले व्याजदर, पाहा किती महाग होणार तुमचा EMI

आरबीआयने सर्व बँकांना 30 जून 2023 पर्यंत किमान 50 % लॉकरधारकांनी नवीन करारावर स्वाक्षरी केल्याचे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व बँकांनी त्यांच्या ग्राहकांना आवश्यक तपशील देणं बंधनकारक आहे. लॉकरबाबतची माहिती बँकेच्या पोर्टलवरही असणं आवश्यक आहे. SBI ग्राहकांसाठी लॉकरचे शुल्क लॉकरचा आकार आणि स्थान यावर अवलंबून असेल. लहान आणि मध्यम आकाराच्या लॉकर्सवर लागू जीएसटीसह 500 रुपये आकारले जातील. दुसरीकडे, मोठ्या लॉकरसाठी 1000 रुपये आणि जीएसटी नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे.

वर्षभराची FD करायची गरज नाही, 30-40 दिवसांतही होते कमाई; कशी करायची गुंतवणूक?

संबंधित बातम्या

शहरी किंवा मेट्रो शहरांमधील लहान लॉकरसाठी, SBI ग्राहकांना 2,000 रुपये अधिक GST भरावा लागेल. शहरी किंवा मेट्रो शहरांमध्ये मध्यम आकाराच्या लॉकरची किंमत 4,000 रुपये आणि जीएसटी असेल. मोठ्या आणि मेट्रो शहरांमध्ये मोठ्या आकाराचे लॉकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून 8,000 रुपये अधिक GST आकारला जाईल. छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात, जीएसटी व्यतिरिक्त, लहान लॉकरसाठी शुल्क 1,500 रुपये असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या