JOIN US
मराठी बातम्या / मनी / YONO खातं बंद होणार तुम्हाला आलाय का मेसेज? SBI ने सांगितलं व्हायरल मेसेज मागचं सत्य

YONO खातं बंद होणार तुम्हाला आलाय का मेसेज? SBI ने सांगितलं व्हायरल मेसेज मागचं सत्य

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सर्वात मोठा अलर्ट दिला आहे. तुमची एक चूक खूप महागात पडू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sbiमुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सर्वात मोठा अलर्ट दिला आहे. तुमची एक चूक खूप महागात पडू शकते. न्यू ईयरआधी अशी कोणतीही चूक करू नका. तुम्हाला जर SBI च्या नावाने काही SMS आला असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. तिथे दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लीक केलं तर तुमचं खातं हॅक होऊ शकतं. हॅकर्स सध्या वेगवेगळे फंडे आजमावत आहे. तुमच्या खात्यातील रक्कम लंपास करण्यासाठी तुमच्या नंबरवर वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खूप अलर्ट राहावं लागेल असं SBI ने म्हटलं आहेय तुमची एक चूक तुमच्या मेहनतीचे पैसे घालवू शकते, ही माहिती SBI ने ट्वीट करून दिली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? एका व्यक्तीला तुमचं YONO खातं आजच बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेच खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा. तुमचं खातं बंद होऊ नये यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करा असा SMS आला. त्याने हा SMS SBI ला ट्विट करून टॅग केला. त्यावर SBI ने हा SMS फ्रॉड असल्याचं म्हटलं आहे.

नव्या बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये होणार बदल?

अशा कोणत्याही प्रकारचे SMS SBI कडून केले जात नाहीत असं बँकेनं म्हटलं आहे. याशिवाय ग्राहकांनी अशा SMS पासून सावध राहायला हवं. तुम्ही तुमचा OTP, CVV, कार्ड नंबर किंवा खात्याशी संबंधित कोणतीही माहिती कोणालाही शेअर करू नये असा सल्ला दिला आहे. कसा ओळखायचा हा SMS बँकेचा आहे की नाही बँक कधीच 10 अंकी मोबाईल नंबरवरून SMS करत नाही. त्यासाठी एक सिस्टिम कोड असतो. उदा BP-SBI अशा पद्धतीने तो कोड सारखा येतो. तो सिस्टिम जनरेटेड मेल असल्याने त्यावर तुम्ही रिप्लाय दिला तरी पोहोचणार नाही. त्यामुळे तुम्हाला समोरून SMS पुन्हा येणार नाही.

खराब सिबिल स्कोअरमुळे लोन मिळत नाही; मग असा सुधारा

संबंधित बातम्या

जाहिरात

कस्टमर केअर नंबर हा कधीच 10 अंकी नसतो. त्यामुळे मोबाईलनंबर सारख्या दिसणाऱ्या कस्टमर केअर नंबरपासून जरा सावध राहाणं केव्हाही योग्यच. याशिवाय तुमची कोणतीही माहिती तुम्ही बँकेव्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीला कुठेच शेअर करू नका. तुमच्या मोबाईलवर सेव्ह करू नका. तुम्ही चुकून अशा लिंकवर क्लीक केलं तर पुढे प्रक्रिया करण्याआधी सावध व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या