मुंबई: सध्या आपली सगळी कामं मोबाईल किंवा ऑनलाइन होतात. एका क्लिकवर सगळी काम होत असल्याने आपण SMS आणि ऑनलाइन बँकिंगकडे जास्त लक्ष ठेवून असतो. बँकेनं ग्राहकांसाठी अलर्ट दिला आहे. ग्राहकांना चकवा देऊन त्यांच्या खात्यावर चोर डल्ला मारत आहेत. याच सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी बँकेनं एक ट्वीट करून अलर्ट दिला आहे. तुम्हालाही जर आला असेल असा मेसेज तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. अनोळखी नंबरवरून लिंक आली तर तुम्ही त्यावर क्लीक करू नका असं म्हटलं आहे. SBI बँकेच्या नावाने तुम्हाला KYC करण्यासाठी एक SMS येईल. त्यासोबत एक लिंकही दिली जाते. या लिंकवर चुकूनही क्लीक करू नका असं बँकेनं ट्वीट करून म्हटलं आहे. खात्यातून पैसे गेले पण ATM मधून आलेच नाहीत; अशावेळी नेमकं काय करायचं? हा अलर्ट देताना बँकेनं SMS मधील त्रुटी दाखवून तो कसा फ्रॉड आहे हे देखील सांगितलं आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार या SMS मध्ये व्याकरणाच्या भयंकर चुका आहेत. त्यासोबत लिहिण्याचा फॉरमॅट देखील चुकीचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा SMS तुम्हाला एखाद्या मोबाईल नंबरवरून पाठवला जातो.
बँकेचे SMS हे सर्व्हर थ्रू येतात त्यामुळे नंबरवरून येणारे SMS हे नक्कीच फसवे असतात. अशा SMS पासून सावध राहायला हवं. असे SMS किंवा फोन याकडे दुर्लक्ष करा. शक्य असेल तर त्यांना रिपोर्ट करून ब्लॉक करा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नका. KYC साठी कधीही SBI तुम्हाला लिंक पाठवणार नाही. कस्टमर केअर नंबर हा कधीच 10 अंकांचा नसतो. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते हे तुमच्या नंबर पाहूनच लक्षात यायला हवं. LIC पॉलिसीवर स्वस्तात मिळतो पर्सनल लोन; तुम्हाला माहितेय का याबाबत?
तुमचा फोन नंबर, खात्याचा नंबर आणि इतर कोणत्याही बँकेशी निगडीत गोष्टी कोणालाही शेअर करू नका. शक्यतो SMS किंवा चॅटवर तर अजिबातच नाही. त्यामुळे हॅकर्स त्याचा गैरवापर करू शकतात. बँकेच्या कस्टमर केअरकडे तुमचे सगळे डिटेल्स असतात. त्यामुळे तुमचे कोणतेही कॉन्फिडेन्शिअल डिटेल्स ते कधीच फोनवर मागत नाहीत.