मुंबई : महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. US फेडर रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात ०.७५ टक्क्यांनी वाढ केली आहे. पुढच्या तीन महिन्यांत आणखी व्याजदर वाढेल असा अंदाज आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. आज मार्केट सुरू होताच रुपयाने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. डॉलरचं मूल्य वाढलं आणि रुपया घसरला आहे. याचा सगळ्यात मोठा फटका भारताला बसणार आहे. रुपया घसरल्याने भारतातील अनेक गोष्टी सणासुदीच्या काळात महाग होण्याची चिन्हं आहेत. एका डॉलरसाठी आता ८०.२८ रुपये मोजावे लागणार आहेत. रुपयाचे मूल्य निचांकाहून खाली घसरलं आहे. त्यामुळे येत्या काळात महागाई जास्त वाढण्याची शक्यता आहे. भारतात पेट्रेल-डिझेलचे दर येत्या काळात वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे नवरात्र-दिवळीला पेट्रोलचे दर वाढतील. याशिवाय काही डाळी आणि वस्तू- इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. हे वाचा-Stock Market : PNB, टर्बाइन सोबत या स्टॉक्सवर फोकस, गुंतवणूक फायद्याची ठरेल?
हे वाचा-Home Loan संपण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर होईल मोठं नुकसान दुसरीकडे याचा सगळ्या मोठा फायदा भारतातील IT सेक्टरला होणार आहे. त्यामुळे शेअर बाजारातील IT कंपन्यांचे शेअर्सही येत्या काळात वधारण्याची शक्यता आहे. याकडे देखील लक्ष राहिल. डॉलरचे मूल्य वाढल्याने त्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावरही होत असल्याचं दिसत आहे.