JOIN US
मराठी बातम्या / मनी / खुशखबर! Driving License काढणं आणखी सोपं, घरीच उपलब्ध होणार 57 सेवा

खुशखबर! Driving License काढणं आणखी सोपं, घरीच उपलब्ध होणार 57 सेवा

चिंता मिटली! RTO कार्यालयात फेऱ्या मारण्याच्या कटकटीतून होणार सुटका, सरकारने ५७ सेवांची लिस्ट केली जारी पाहा तुमच्या कामाची बातमी

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : ड्रायव्हिंग लायसन असो किंवा त्याच्याशी निगडीत असलेली कोणतीही कामं असो आता RTO चे खेटे घालणं आणि १० वेळा काम झालं की नाही ते तपासण्याचं टेन्शन नाही. आता तुम्हाला घरबसल्या ही कामं करता येणार आहेत. RTO शी निगडीत ५८ सेवा आता तुम्हाला घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. तुम्ही घरबसल्या लर्निंग लायसन, ड्रायव्हिंग लायसनची कॉपी आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी ऑनलाइन करू शकता. रस्ते परिवहन मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. यासाठी तुम्हाला आधारकार्ड देखील व्हेरिफाय करता येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 16 सप्टेंबर रोजी ऑनलाइन याबाबत निवदेन जारी केलं. मंत्रालयाने RTO शी संबंधित 58 सेवा ऑनलाइन केल्या आहेत. हे वाचा-  वृद्धांना वर्षाला मिळणार 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, आजच करा ‘ही’ गोष्ट

संबंधित बातम्या

यामुळे लोकांची गर्दी कमी होईल आणि नागरिकांचा वेळ वाचेल, असे परिवहन मंत्रालयाचे म्हणणे आहे. लर्नर्स लायसन्स आणि डुप्लिकेट लर्नर्स लायसन्ससाठी अर्ज करणे, लर्नर्स लायसन्समधील पत्ता, नाव, फोटो यामध्ये कोणताही बदल करणे, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, ड्रायव्हिंग लायसन्समध्ये नाव, पत्ता बदलणे इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. हे वाचा-  Post Office : पोस्टच्या ‘या’ योजनेत फक्त 417 रुपये गुंतवाल तर करोडपती व्हाल! वाहनाच्या तात्पुरत्या नोंदणीसाठी अर्ज, मोटार वाहनाच्या तात्पुरत्या नोंदणीसाठी अर्ज, परवानगी संबंधित सेवा, डुप्लिकेट फिटनेस प्रमाणपत्र अशा ५८ सुविधा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. हे वाचा-  गृहकर्ज घेण्यापूर्वी या गुप्त गोष्टी माहिती असेल तर EMI होईल कमी यामुळे सरकारी कार्यालयात वेगानं काम होईल आणि गर्दी होणार नाही असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि सतत RTO ऑफिसला फेऱ्या मारण्याच्या कटकटीपासून सुटका होईल. याशिवाय पैशांची बचत होईल आणि RTO मध्ये लांबच्या लांब रांगा लागण्याचं प्रमाण कमी होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या