JOIN US
मराठी बातम्या / मनी / कोट्यधीश कुत्रा! वर्षाकाठी कमावतोय तब्बल 'इतके' कोटी, तो करतोय तरी काय?

कोट्यधीश कुत्रा! वर्षाकाठी कमावतोय तब्बल 'इतके' कोटी, तो करतोय तरी काय?

Car Loan: बजेटच्या कमतरतेमुळे अनेकजण कार घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. अशा वेळी, कर्ज घेण्यापूर्वी, काही महत्त्वाच्या गोष्टी जसे की EMI आणि बँकांकडून कर्ज देण्याच्या अटी आणि नियम जाणून घेणे आवश्यक आहे.

जाहिरात

कुत्रा करतो कोट्यवधींची कमाई

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मे : अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया हे आपलं टॅलेंट लोकांसमोर प्रदर्शित करण्याचं आणि त्याच माध्यमातून कमाई करण्याचा स्रोत बनलं आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब आणि टिकटॉक यांसारख्या असंख्य व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा लाभ करून घेऊन अनेक जण लाखो आणि कोट्यवधी रुपये कमवत आहेत. सोशल मीडियामुळे सोशल मीडिया एन्फ्लुएर्सदेखील मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. अशा अनेकांना तुम्हीही ओळखत असाल, फॉलो करत असाल; पण यामध्ये प्राणीही मागे राहिले नाहीत. असाच एक पाळीव कुत्रा आहे, जो सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत आहे. या संदर्भातलं वृत्त ‘डीएनए’ने दिलं आहे.

एंटर टकर नावाचा एक गोल्डन रिट्रायव्हर जातीचा पाळीव कुत्रा आहे. त्याची वार्षिक कमाई तब्बल 8 कोटी 28 लाख रुपये आहे. ‘प्रीटेंड पेट मेमरीज’ नावाची एक संस्था पाळीव प्राण्यांच्या डिजिटल इन्फ्लुएन्सचा शोध घेते. त्यांच्या संशोधनातून असं दिसून आलंय, की टकर जगभरातल्या आघाडीच्या एन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहे. टकरच्या डिजिटल स्टारडमच्या मागे कोर्टनी बडगिनचे कष्ट आहेत. ती टकरची मालकीण असून, त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स सांभाळते. न्यूयॉर्क पोस्टला कोर्टनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, यू-ट्यूबवर टकरचा 30 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केल्यास 30 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कमाई होते. शिवाय, फक्त 3 ते 8 इन्स्टाग्राम स्टोरीज तयार केल्याने टकरला 16 लाख रुपये मिळतात. इतकंच नाही तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचं उत्पन्न गृहीत धरून टकरच्या वार्षिक कमाईने तब्बल आठ कोटींचा टप्पा गाठला आहे.

प्रत्येक वेळी मिळेल कन्फर्म तत्काळ तिकीट! ‘या’ ट्रिकने 100 टक्के मिळेल यश

सुरुवातीला टकरची मालकीण कोर्टनी घराच्या साफसफाईशी संबंधित कामं करायची. तिचा पती सिव्हिल इंजिनीअर. टकरच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे त्यांनी आपली कामं सोडली आणि टकरच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लक्ष केंद्रित केलं. दिवसेंदिवस टकरच्या प्रसिद्धीत मोठी वाढ होऊ लागली आणि आता त्याच्या माध्यमातून हे दाम्पत्य वर्षाकाठी आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहे. टकरच्या स्टारडमची सुरुवात जून 2018मध्ये झाली. तेव्हा तो फक्त आठ आठवड्यांचा होता. त्याचा मोठं होत असतानाचा प्रवास कुठेतरी जपून ठेवला जावा, या उद्देशाने कोर्टनीने त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलं. त्यावर त्याचे विविध व्हिडिओ व फोटो शेअर केले जात होते. अवघ्या सहा महिन्यांत टकरचे 60 हजार फॉलोअर्स झाले. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढत राहिला. सध्या टकरचे यू-ट्यूबवर 51 लाख, इन्स्टाग्रामवर 34 लाख, ट्विटरवर 62 लाख आणि फेसबुकवर 43 लाख फॉलोअर्स आहेत.

पोस्ट ऑफिसमध्येही जमा करु शकता 2 हजारांची नोट? बदलताही येतील का? घ्या जाणून

संबंधित बातम्या

सोशल मीडियावर कोण कधी स्टार बनेल, कोणाचं स्टारडम कधी खाली जाईल, याची कोणतीच शाश्वती नसते. अशा परिस्थितीतही टकर गेल्या पाच वर्षांपासून त्याचं स्टारडम टिकवून आहे. शिवाय, तो त्याच्या मालकांना सोशल मीडिया उपस्थितीतून कोट्यवधी रुपये कमवून देत आहे. एका पाळीव प्राण्याचा हा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या