JOIN US
मराठी बातम्या / मनी / Lockdown : छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, मोदी सरकारच्या आदेशानंतर या बँकेकडून मिळतेय मदत

Lockdown : छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, मोदी सरकारच्या आदेशानंतर या बँकेकडून मिळतेय मदत

लॉकडाऊनमुळे फटका बसलेल्या MSME सेक्टरला लोन रिस्ट्रक्चरिंग, क्रेडिट लिमिटमध्ये वाढ आणि व्याज भरण्यासाठी मोरटोरियम या सुविधा मिळणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 मे : लॉकडाऊनमुळे फटका बसलेल्या MSME सेक्टरला लोन रिस्ट्रक्चरिंग, क्रेडिट लिमिटमध्ये वाढ आणि व्याज भरण्यासाठी मोरटोरियम या सुविधा मिळणार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानंतर बँकांनी याबाबत निर्णय घेण्यावर विचार करण्यास सुरूवात केली आहे. बँक ऑफ बरोडाने छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्पेशल कोव्हिड इमर्जन्सी पॅकेज देण्यासही सुरूवात केली आहे. या अंतर्गत कोरोनाच्या संकटाशी सामना करतान MSME ना जास्त रोख रक्कम देण्याची योजना आहे. बँक ऑफ बरोडाने त्यांच्या 49 हजार MSME ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. बँकेकडून व्याज भरण्यासाठी सुद्धा मोरटोरियम  देण्याची तयारी -बँक ऑफ बडोदाच्या स्पेशल कोव्हिड इमर्जन्सी क्रेडिट स्कीममध्ये छोट्या व्यापाऱ्यांना लोन रिस्ट्रक्चरिंगचा फायदा मिळेल (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये ‘या’ बँकेचा परवाना रद्द, लाखो खातेधारकांना RBIचा झटका ) -कंपन्यांच्या क्रेडिट लिमिटमध्ये वाढ करण्याचाही योजना यामध्या सामाविष्ट आहे -बँकेने व्याज भरण्यासाठी सुद्धा मोरटोरियम  देण्याची तयारी दाखवली आहे लॉकडाऊनमध्ये छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान साहाजिकच कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे MSME सेक्टरवर त्याचा वाईट परिणाम झाला आहे. त्यातच 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर नुकसानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हसेजच्या मते या कठीण प्रसंगाशी लढण्यासाठी MSMEला सॉफ्ट लोन, कॅश ट्रान्सफर आणि लोन रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे. (हे वाचा- लॉकडाऊमुळे सेलिब्रिटी शेफ पूजा धिंग्राला फटका,मुंबईतील प्रसिद्ध कॅफे करणार बंद ) दिवसाच्या पगारावर काम करणाऱ्या मजूरांच्या आयुष्यावर देखील कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा मोठा परिणाम होणार आहे. वाहतूक बंद असल्यामुळे हे प्रवासी कामगार त्यांच्या घरी देखील जाऊ शकत नाही आहे. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रावर देखील या लॉकडाऊनचा वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या धक्क्यातून न सावरलेलं हे क्षेत्र नवीन संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यापारी त्यांचा व्यवसाय बंद करण्याच्या कठीण निर्णयापर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या