JOIN US
मराठी बातम्या / मनी / Home Loan, Auto Loan घेणाऱ्यांसाठी दिलासा, EMI वाढणार नाही; काय आहे कारण?

Home Loan, Auto Loan घेणाऱ्यांसाठी दिलासा, EMI वाढणार नाही; काय आहे कारण?

अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बँक ऑफ अमेरिका (Bank Of America) सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की RBI 8 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत प्रमुख धोरण दरांमध्ये कोणतेही बदल करणार नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 फेब्रुवारी: तुम्ही जर नवीन घर किंवा नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण होम लोन (Home Loan) आणि कार लोन (Car Loan) दोन्ही प्रकारची कर्जे एप्रिलपर्यंत महाग होणार नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, मध्यवर्ती बँकेची एप्रिल 2022 पर्यंत रेपो दरात वाढ करण्याची कोणतीही योजना नाही. असे झाले तर कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार नाही. अमेरिकन ब्रोकरेज कंपनी बँक ऑफ अमेरिका (Bank Of America) सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की RBI 8 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत प्रमुख धोरण दरांमध्ये कोणतेही बदल करणार नाही. रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. महागाई वाढू शकते बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने सांगितले की आरबीआय वाढ-केंद्रित आणि कॅपेक्स-चालित (growth-focused and capex-driven) वित्तीय विस्ताराकडे जाईल. यामुळे किमती वाढू शकतात आणि त्यानंतर व्याजदराचा धोका होऊ शकतो. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जगातील जवळपास सर्वच प्रमुख केंद्रीय बँका दर वाढवण्याच्या तयारीत आहेत. मे 2020 पासून भारतातील प्रमुख रेपो रेपोमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि तो 4 टक्क्यांवर स्थिर आहे, जो आतापर्यंतचा सर्वात कमी स्तर आहे. LIC IPO : तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर स्वस्तात मिळणार शेअर फेडरल रिझर्व्ह वाढू शकते बँकेने म्हटले आहे की यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर वाढीची अपेक्षा असूनही, आरबीआय हळूहळू चलनविषयक धोरण सामान्य पातळीवर आणण्याचा मार्ग स्वीकारेल. सध्या, बाँड यील्ड 6.9 टक्के आहे, जे 2019 च्या प्री-कोरोना पातळीपेक्षा जास्त आहे. अर्थसंकल्पात सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी बाजारातून भरीव कर्ज घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील रोख्यांचे व्याजदर वाढले आहेत. ICICI बँक क्रेडिट कार्ड यूजर्सना झटका, 10 फेब्रुवारीपासून अनेक चार्जेस वाढणार एप्रिलमध्ये रिव्हर्स रेपो रेट 0.4 टक्क्यांनी वाढू शकतो बँक ऑफ अमेरिकाचा अंदाज आहे की रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेटमधील फरक आरबीआय प्रथम कमी करेल. एप्रिलमध्ये तो रिव्हर्स रेपो 0.40 टक्क्यांनी वाढवून 3.75 टक्के करु शकतो. त्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपोमधील अंतर 0.25 टक्क्यांच्या आधीच्या पातळीवर येईल. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय पहिल्यांदा जूनमध्ये घेतला जाऊ शकतो. डिसेंबरपर्यंत तो 4 टक्क्यांवरून 4.75 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या