JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता QR कोड स्कॅन करुन निघतील नाणी, RBI चा 12 शहरात पायलट प्रोजेक्ट

आता QR कोड स्कॅन करुन निघतील नाणी, RBI चा 12 शहरात पायलट प्रोजेक्ट

मॉनिटरी पॉलिसीविषयी माहिती देताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, नाण्यांची उपलब्धता लोकांसाठी सुलभ आणि सहज व्हावी यासाठी आरबीआय हा प्रोजेक्ट हाती घेतला जातोय.

जाहिरात

यूपीआयविषयी मोठी घोषणा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँके ने आज आपल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निर्णय जाहीर केले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, एमपीसीच्या बैठकीत 6 पैकी 4 सदस्य रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याच्या बाजूने होते. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के केला आहे. दरम्यान आरबीआय एक पायलट प्रोजेक्ट आणणार आहे. त्या अंतर्गत क्यूआर कोड स्कॅन करुन नाणी काढता येतील.

RBI लॉन्च करणार पायलट प्रोजेक्ट

या मोठ्या घोषणेसोबतच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी इतरही अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. लोकांच्या सोयीसाठी आरबीआयनेही एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा केली आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत आरबीआय क्यूआर कोड बेस्ड कॉइन वेंडिंग मशीन्स लावेल. सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 12 शहरांमध्ये QR कोड आधारित कॉईन व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. मॉनिटरी पॉलिसीविषयी माहिती देताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, नाण्यांची उपलब्धता लोकांसाठी सुलभ आणि सहज व्हावी यासाठी आरबीआय हा पुढाकार घेत आहे.

तुमचं HDFC बँकेंत अकाउंट आहे? मग हे बदल वाचाच

जाणून घ्या या प्रोजेक्टबद्दलच्या खास गोष्टी

-नाणी वितरीत करण्यासाठी क्यूआर कोड बेस्ड कॉइन वेंडिंग मशीन्स बसवण्यात येणार आहेत. 12 शहरांमध्ये लोकांना नाण्यांच्या तुटवड्याची चिंता करण्याची गरज नाही. -ही मशीन नाणी वितरीत करतील आणि यासाठी ग्राहकाला UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) पेमेंट पर्याय वापरावा लागेल. -मशीनमधून बँक नोटांऐवजी नाणी वितरीत केली जातील. -नाण्यांचा वापर अधिक सुलभ व्हावा यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. -आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, पायलट प्रोजेक्टच्या फीडबॅकवर आधारित, मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील जेणेकरून या मशीनद्वारे नाणी जारी करण्यासाठी सोपे आणि जलद नियम बनवता येतील.

रेपो रेट वाढवल्यानंतर कितीने वाढणार EMI? सोप्या शब्दात समजून घ्या कॅल्क्यूलेशन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या