JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI Plan : यूपीआय पेक्षाही सोपी सिस्टम आणणार RBI, मोबाईल नेटवर्कशिवाय ट्रान्सफर होतील पैसे!

RBI Plan : यूपीआय पेक्षाही सोपी सिस्टम आणणार RBI, मोबाईल नेटवर्कशिवाय ट्रान्सफर होतील पैसे!

RBI एक लाइटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम आणणार आहे. जी इंटरनेट काम करत नसतानाही चालेल. म्हणजेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा संघर्षाच्या ठिकाणी ही यंत्रणा काम करेल.

जाहिरात

ऑनलाइन ट्रांझेक्शन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 जून : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एका लाइटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर काम करतेय. ही सिस्टम नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचारास प्रवण असलेल्या भागात कमीतकमी संसाधनांसह काम करेल. तसंच यूझर्सला पैसे ट्रान्सफर करण्यास सुविधा देईल. ही सिस्टम कधी सुरू होईल याची माहिती अद्याप आरबीआयने दिलेली नाही. पैसे पाठवण्‍यासाठी आता उपलब्‍ध असलेले पर्याय, मग ते UPI, NEFT किंवा RTGS असो, सर्व इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करतात. आरबीआयचे म्हणणे आहे की, लाइटवेट पेमेंट सिस्टम या तंत्रांवर अवलंबून राहणार नाही. म्हणजेच मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट नसले तरीही या सिस्टमद्वारे पैसे पाठवले जाऊ शकतात.

RBI च्या वार्षिक रिपोर्टमध्ये लाइटवेट सिस्टमचा उल्लेख आहे

RBI ने 30 मे रोजी 2022-23 चा वार्षिक अहवाल पब्लिश केला. यामध्ये बँकेने लाइटवेट आणि पोर्टेबल पेमेंट सिस्टमचा उल्लेख केला आहे. आरबीआयने लिहिले की, ही सिस्टम कमीतकमी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह काम करेल. ही सिस्टम फक्त गरजेच्या वेळी वापरली जाईल. म्हणजेच, UPI आणि इतर पेमेंट पद्धतींप्रमाणे, लाइटवेट सिस्टम सर्वांसाठी खुली असणार नाही. ही सिस्टम फक्त अशाच परिस्थितीत वापरली जाईल ज्यामध्ये प्रचलित पेमेंट सिस्टम कार्य करू शकणार नाहीत.

Money Tips: ईएमआयच्या ओझ्यामुळे हैराण झालात? या ट्रिक्सने कमी करु शकता भार

आरबीआयचे म्हणणे आहे की ही सिस्टम कोणत्याही परिस्थितीत देशाची पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम थांबवू देणार नाही. तसंच अर्थव्यवस्थेची लिक्विडिटी पाइपलाइन टिकवून ठेवेल. ही सिस्टम सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक पेमेंट सेवांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रांझेक्शनमध्ये मदत करणे हा या सिस्टमचा उद्देश आहे.

How Internet Works: इंटरनेट कसं काम करतं कधी विचार केलाय? समुद्रात अंथरल्या आहेत तारा

संबंधित बातम्या

सेंट्रल बँकेने आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेय की, ‘युद्धाच्या प्रसंगी बंकर जसे काम करते तसे हे पेमेंट सिस्टममध्ये काम करेल. यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डिजिटल पेमेंट आणि फायनेंशियल मार्केटच्या इंफ्रास्ट्रक्चर लोकांचा विश्वास वाढेल.

UPI पेक्षा कसा वेगळा असेल लाइटवेट सिस्टम?

सध्या भारतात पेमेंटचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हे सर्व मोठे ट्रांझेक्शन करण्यास सक्षम असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे. हे कॉम्प्लेक्स नेटवर्क आणि अडव्हान्स्ड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चरवर आधारित आहेत. आरबीआयचे म्हणणे आहे की, एक्स्ट्रीम कंडीशन्समध्ये इंफॉर्मेशन आणि किम्युनिकेशन इंफ्रास्ट्रक्चर प्रभावित होतो. त्यामुळे या पेमेंट सिस्टम काम करू शकत नाहीत. म्हणूनच अशा परिस्थितीसाठी आपण तयार असणे महत्त्वाचे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या