RBI Tokenization: 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट-डेबिट कार्ड टोकन बनवणं आवश्यक, वाचा प्रोसेस अन् फायदे
मुंबई, 29 सप्टेंबर: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी पुढील महिन्यापासून काही नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (CoF Card Tokenisation) नियम 01 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI Tokenisation) म्हणते की टोकनायझेशन प्रणाली लागू केल्यानंतर, कार्डधारकांचा पेमेंट पद्धती सुधारेल आणि डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. लोकांना बँकांकडून कार्डच्या टोकनायझेशनचे मेसेजही मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की हे कार्ड टोकनायझेशन म्हणजे काय, कार्ड टोकनायझेशनची प्रक्रिया काय आणि त्याचे फायदे-तोटे काय आहेत. आज आम्ही तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत… टोकनायझेशन न केल्याने होणार हे नुकसान- खरंतर नवीन नियम लागू झाल्यानंतर, जेव्हा जेव्हा ग्राहक पॉइंट ऑफ सेल मशीन्सवर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे, ऑनलाइन किंवा कोणत्याही अॅपमध्ये पेमेंट करतील तेव्हा त्यांचे कार्ड तपशील एनक्रिप्टेड टोकनच्या स्वरूपात संग्रहित केले जातील. यापूर्वी हा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार होता. विविध भागधारकांकडून मिळालेल्या सूचना लक्षात घेऊन, आरबीआयने कॉर्ड-ऑन-फाइल डेटा संचयित करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत वाढवली होती. नंतर ती पुन्हा 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. आता ही मुदत आणखी वाढवण्याचा रिझर्व्ह बँक विचार करत नाही. याचा अर्थ आता पेमेंट कंपन्यांना 30 सप्टेंबर 2022 नंतर लोकांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा डेटा मिटवावा लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही कार्ड टोकनायझेशन केलं नाही, तर तुम्ही आधीच विविध प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर सेव्ह केलेल्या कार्डद्वारे पैसे देऊ शकणार नाही. हेही वाचा: नवीन नियमांमुळे तुम्हाला हे फायदे मिळतील- रिझव्र्ह बँकेचे हे नवे नियम बहुतेक मोठ्या व्यापाऱ्यांनी आधीच स्वीकारले आहेत. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या बदल्यात आतापर्यंत 195 कोटी टोकन ग्राहकांना देण्यात आली आहेत. मात्र अशा ग्राहकांची संख्या अजूनही करोडोंच्या घरात आहे, ज्यांनी अद्याप आपलं कार्ड टोकन घेतलेलं नाही. नवीन सिस्टीमनुसार रिझर्व्ह बँकेनं पेमेंट कंपन्यांना ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा डेटा संग्रहित करण्यास मनाई केली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याला टोकन असं म्हटलं गेलं आहे. ही टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल. याची अंमलबजावणी झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंटसाठी थेट कार्ड वापरण्याऐवजी युनिक टोकन वापरावं लागेल. नवीन नियम लागू झाल्यानंतर कार्डनं पैसे भरणं सोपे होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. टोकनीकरणामुळे फसवणूक कमी होईल- कार्डच्या बदल्यात टोकन देऊन पैसे देण्याची प्रणाली लागू केल्याने फसवणुकीचं प्रमाण कमी होईल, असा रिझर्व्ह बँकेचा विश्वास आहे. सध्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती लीक झाल्यामुळे ग्राहकांशी फसवणूक होण्याचा धोका वाढतो. नवीन प्रणालीमुळे अशा फसवणुकीच्या घटना कमी होण्याची अपेक्षा आहे. रिझव्र्ह बँकेचं म्हणणं आहे की, सध्या ई-कॉमर्स वेबसाइट्स, व्यापारी स्टोअर्स आणि अॅप्स इ. ग्राहकांनी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यानंतर कार्ड तपशील संग्रहित करतात. अनेक वेळा व्यापाऱ्यांसमोर ग्राहकांना त्यांचा कार्ड तपशील ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. हे तपशील लीक झाल्यास ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांमुळे हे धोके कमी होतील. आता तुमच्या कार्डचा कोणताही डेटा जसे की कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्ही नंबर इत्यादी कुठेही साठवलं जाणार नसल्यामुळं ते लीक होण्याची शक्यताही संपुष्टात येईल. जेव्हा तुमचा हा संवेदनशील डेटा सायबर ठगांच्या हाती लागणार नाही, तेव्हा तुम्ही नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असाल. तुमचे क्रेडिट/डेबिट कार्ड टोकन कसे करायचे? कार्ड टोकन करण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती नुकतीच रिझर्व्ह बँकेने सोशल मीडियावर दिली होती. तुम्ही तुमच्या घरच्या आरामात फक्त 06 सोप्या चरणांमध्ये तुमचे कार्ड टोकन करू शकता…