मुंबई, 23 ऑगस्ट : महागाईचा दर हळूहळू कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र कर्जाच्या दरांमधील वाढ पुढच्या काही काळासाठी सुरु राहू शकते. जर्मनीच्या ड्यूश बँकेने असा अंदाज दिला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँक आपल्या आढाव्यात दर पुन्हा वाढवू शकते. सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये वाढ केल्यामुळे बँकांचे कर्जाचे व्याजतर आधीच वाढले आहेत. रेपो रेट कोरोनाच्या आधीच्या स्थितीत पोहोचले आहे. आता रिझर्व्ह बँक आगामी काळात कर्जाचे दर आणखी वाढवेल असा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्टच्या पतधोरण आढावा बैठकीपूर्वीच बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अजूनही महागाई नियंत्रणास प्राधान्य दिले आहे. मात्र महागाई दर अद्यापही वर आहे. टीव्ही9 हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
इलॉन मस्क यांचा पुणेकर मित्र पोहोचला थेट अमेरिकेत, कशी होती जगातील श्रीमंत व्यक्तीसोबतची भेट?
व्याजदर किती वाढू शकतात? भारतीय रिझव्र्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती (MPC) रेपो दर वाढीची गती कमी करू शकते, असा ड्यूश बँकेचा अंदाज आहे. ड्युश बँकेच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बँक सप्टेंबरच्या चलनविषयक आढाव्यात रेपो दर 0.25 टक्क्यांनी वाढवू शकते. केंद्रीय बँकेने यावर्षी मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ जर्मनीने एका अहवालात म्हटले आहे की, येथून रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीचा वेग कमी करेल. चलनविषयक धोरण समितीच्या शेवटच्या बैठकीचा तपशील नुकताच आला आहे. त्यात महागाई नियंत्रणास प्राधान्य देण्यात आले आहे.
वस्तूंच्या किमतीत झालेली घसरण यामुळे महागाईचा दर कमी होण्याची चिन्हे आहेत. घाऊक किमतींवर आधारित महागाई जुलैमध्ये 13.93 टक्क्यांवर घसरली. ही पाच महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. तर किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात 7 टक्क्यांच्या खाली आला आहे. किरकोळ महागाई सलग सातव्या महिन्यात रिझव्र्ह बँकेने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त राहिली, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने दरात झपाट्याने वाढ केली आहे. महागाईचा दर 2 ते 6 टक्क्यांच्या रेंजमध्ये ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे आणि 2023 च्या सुरुवातीला महागाई दर या उद्दिष्टाच्या आत येण्याची अपेक्षा आहे.