JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI च्या रेपो रेटबाबत निर्णयानंतर बड्या बँकांचा ग्राहकांना दिलासा! अशाप्रकारे मिळणार फायदा

RBI च्या रेपो रेटबाबत निर्णयानंतर बड्या बँकांचा ग्राहकांना दिलासा! अशाप्रकारे मिळणार फायदा

एकीकडे कर्जावरचं व्याज वाढलं (Repo Rate effect on Loan interest) असताना, काही बँकांच्या ग्राहकांना मात्र दिलासाही मिळाला आहे. याला कारण म्हणजे, ठराविक बँकांनी आपल्या FD आणि बचत खात्यांवर असणाऱ्या व्याजदरांत (FD interest) वाढ केली आहे.

जाहिरात

RBI

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 मे: भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी (4 मे 2022) रेपो रेटमध्ये (RBI Repo Rate) वाढ केल्याचं जाहीर केलं. गेल्या कित्येक वर्षांमध्ये पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये वाढ (RBI new Repo Rate) करण्यात आली. 40 बेसिस पॉइंट्स वाढीनंतर आता आरबीआयचा रेपो रेट 4.40 टक्के झाला आहे. यामुळे एकीकडे कर्जावरचं व्याज वाढलं (Repo Rate effect on Loan interest) असताना, काही बँकांच्या ग्राहकांना मात्र दिलासाही मिळाला आहे. याला कारण म्हणजे, ठराविक बँकांनी आपल्या FD आणि बचत खात्यांवर असणाऱ्या व्याजदरांत (FD interest) वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जांच्या व्याजदरांत वाढ केली आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. अशातच कोटक, आयसीआयसीआय, फेडरल आणि जन स्मॉल फायनान्स बँक या बँकांनी आपल्या FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात देखील वाढ (Banks increased FD interest rates) केली आहे. यामुळे या बँकांच्या लाखो ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कोणत्या बँकेने आपल्या व्याजदरात किती टक्के वाढ केली आहे, हे पाहूयात. हे वाचा- RBI च्या रेपो दरवाढीचा होम लोन घेणार्‍यांवर काय परिणाम होईल? EMI, कालावधी किती वाढेल? चेक करा मोठ्या बँकांनी वाढवले FDचे व्याजदर खासगी क्षेत्रातील नामांकित बँकांपैकी एक असणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank FD interest rate) आपल्या 2 कोटी रुपयांहून कमी रकमेच्या FD वरील व्याज दरात 0.35 टक्के वाढ केली आहे. ही वाढ 6 मे 2022 पासून लागू होईल. वेगवेगळ्या कालावधीच्या फिक्स डिपॉझिटसाठी व्याजदरात वेगवेगळ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 390 दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात 0.30 टक्के वाढ करण्यात आली आहे. यानंतर हा व्याजदर 5.50 टक्के झाला आहे. दोन कोटी रुपयांहून कमी रकमेच्या FD साठी जन स्मॉल फायनान्स बँकेनेही (Jana Small Finance Bank FD interest rate) व्याजदर वाढवले आहेत. या बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे, ज्यामुळे हे व्याजदर 7 टक्के झाले आहे. ही दरवाढ केवळ 3 ते 5 वर्षं कालावधी असणाऱ्या FD साठी लागू असेल. हे वाचा- Jio चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स! Disney+ Hotstar तीन महिन्यांसाठी फ्री, जाणून घ्या सविस्तर ICICI बँकेचाही मोठा निर्णय खासगी क्षेत्रातील आणखी एक मोठी बँक असणाऱ्या ICICI बँकेनेही आपल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरांमध्ये वाढ (ICICI FD interest rate) केली आहे. ही वाढ सध्या 2 कोटी ते 5 कोटी रुपये एवढ्या रकमेच्या ठेवींवर लागू करण्यात आली आहे. एफडीच्या कालावधीनुसार व्याजदर वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. 90 दिवसांपर्यंतच्या ठेवींवर आता एक चतुर्थांश (0.25%) अधिक व्याज मिळेल. तर, 271 दिवसांपासून 1 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर असलेल्या व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. तर 2 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 0.15 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या FDचे नवे दर 5 मे 2022 पासून लागू झाले आहेत. हे वाचा- बचत खात्यांवरील व्याजदरात वाढ आरबीआयच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी, फेडरल बँकेने आपल्या बचत खात्यांवर मिळणारे व्याजदर वाढवून ग्राहकांना दिलासा दिला. फेडरल बँकेच्या बचत खात्यांचे व्याजदर (Federal Bank savings account interest rate) हे आरबीआयच्या रेपो रेटशी थेट संबंधित आहेत. बँकेच्या नव्या निर्णयानुसार, बचत खात्यामध्ये एक लाख रुपयांहून कमी रक्कम असेल, तर त्यावर आरबीआयच्या रेपो रेटपेक्षा 1.75 टक्के कमी व्याज मिळेल. तसंच एक लाखांहून अधिक ठेवीवर आरबीआयच्या रेपो रेटपेक्षा 0.60 टक्के कमी व्याज मिळणार आहे. आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉइंट्सची वाढ केल्यामुळे, फेडरल बँकेच्या बचत खात्यावरील व्याजही वाढले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या