Home /News /technology /

Jio चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स! Disney+ Hotstar तीन महिन्यांसाठी फ्री, जाणून घ्या सविस्तर

Jio चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स! Disney+ Hotstar तीन महिन्यांसाठी फ्री, जाणून घ्या सविस्तर

Jio ने लाँच केलेले चार नवीन प्रीपेड प्लॅन 151 रुपये, 333 रुपये, 583 रुपये आणि 783 रुपयांचे आहेत. ज्यामध्ये Disney + Hotstar सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी असतील. जिओच्या या सर्व प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई, 5 मे : जिओ युजर्ससाठी (Jio Users) आनंदाची बातमी आहे. जिओने काही नवीन प्रीपेड प्लॅन (Jio Prepaid Plan) लाँच केले आहेत, या प्लॅनसोबत खास ऑफर्स देण्यात येत आहे. Reliance Jio ने अनेक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. हे सर्व प्लॅन आता तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar ओटीटी मोबाईल सबस्क्रिप्शनसह मिळतील. आत्तापर्यंत सर्व प्रीपेड प्लॅन Disney + Hotstar मोबाइल बेनिफिटसह येतात आणि ते एक वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह येतात. शिवाय हे प्लॅन महाग असल्याने युजर्सना परवडणारे नाहीत. त्यामुळे आता कंपनीने चार नवीन प्लॅन लाँच केले आहेत. Jio ने लाँच केलेले चार नवीन प्रीपेड प्लॅन 151 रुपये, 333 रुपये, 583 रुपये आणि 783 रुपयांचे आहेत. ज्यामध्ये Disney + Hotstar सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी असतील. जिओच्या या सर्व प्लॅनबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. रिलायन्स जिओचा 151 रुपयांचा प्रीपेड प्लॅन केवळ डेटा प्लॅन आहे. तो युजर्सना 8GB डेटा ऑफर करतो. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी युजर्सकडे अॅक्टिव्ह बेस प्लॅन असणं आवश्यक आहे. हा प्लॅन युजर्सना Disney + Hotstar Mobile चे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन देईल. यासंदर्भात लाईव्ह हिंदुस्तानने वृत्त दिलंय. तुम्ही Google Chrome वापरता? लगेच करा हे काम, सरकारचा मोठा इशारा रिलायन्स जिओचा 333 रुपयांचा प्रीपेड प्लॅन रिलायन्स जिओच्या 333 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह युजर्सना 28 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100 SMSसह, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल. प्लॅनमध्ये Disney+ Hotstar Mobileच्या तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह Jio अॅप्स एकत्रित उपलब्ध होतील. या प्लॅनमध्ये नवीन ग्राहकांना प्राइम सबस्क्रिप्शन मोफत दिले जाणार आहे. रिलायन्स जिओचे 583 आणि 783 रुपयांचे प्लॅन जिओचा 583 रुपयांचा आणि 783 रुपयांचा प्रीपेड प्लॅन त्यांच्या व्हॅलिडीटीशिवाय 333 रुपयांच्या प्लॅन सारखाच आहे. 583 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 56 दिवसांची वैधता मिळते, तर 783 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 84 दिवसांची वैधता मिळते. सावधान! Browser वर वेबसाइटचं नाव टाइप करताना घ्या काळजी; अन्यथा होऊ शकतं नुकसान दरम्यान, या दोन प्लॅनमध्ये प्राइम सबस्क्रिप्शन मोफत दिले जात नाही आणि नवीन युजर्सकडून प्राइम मेंबरशिपसाठी 100 रुपये घेतले जातील. सध्या कोणताही प्रीपेड प्लॅन युजर्सना Disney+ Hotstar मोबाइलच्या तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन देत नाही. तुम्ही जिओ युजर्स असाल, तर तुमच्याजवळ Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी मिळवण्याची चांगली संधी आहे. शिवाय तुम्ही तुमच्या बजेटनुसार इतर रिचार्ज प्लॅन घेऊ शकता.
First published:

Tags: Mobile Phone, Reliance, Reliance Jio

पुढील बातम्या