मुंबई, 11 जुलै : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) नागरिकांच्या सुविधेसाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी नेहमीच नवनवीन उपाययोजना आणत असते. देशातील यूपीआयचा (UPI) वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देशात कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या नवीन सेवेमध्ये, ग्राहक केवळ UPI च्या मदतीने एटीएममधून पैसे काढू शकतात आणि त्यांना मशीनमध्ये एटीएम कार्ड घालण्याची गरज नाही. नवीन सुविधेला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (Interoperable Cardless Cash Withdrawal- ICCW) असे नाव देण्यात आले आहे. RBI ने सर्व बँकांना त्यांच्या ATM मध्ये ICCW सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI शी संबंधित एक नवीन सुविधा विकसित केली आहे. एटीएम मशिनमध्ये कार्डलेस कॅश विथड्रॉवल इन्स्टॉल झाल्यानंतर, तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe आणि इतर UPI अॅप्सद्वारे पैसे काढू शकता. यासाठी फक्त तुमचा फोन तुमच्यासोबत असणे आवश्यक आहे. एटीएममधील फसवणूक रोखण्यासाठी ही नवीन सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना त्यांच्या एटीएममध्ये ही सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितले आहे. Free Silai Machine Scheme: सरकार मोफत देत आहे शिलाई मशीन, आजच करा अर्ज यासाठी शुल्क काय असेल? मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, यूपीआय वापरून एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाईल की ही सुविधा मोफत उपलब्ध होईल, याबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की कोणतीही बँक UPI मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारू शकत नाही. कार्डलेस सुविधा एटीएम, डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्यासारखीच असेल. यूपीआय वापरून एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकण्याची गरज नाही. एटीएम स्क्रीनवर QR कोड दिसेल, जो फोनद्वारे स्कॅन केला जाईल आणि तुम्ही पैसे काढू शकाल. अशा परिस्थितीत कार्ड क्लोनिंग टाळता येईल. Airtel च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदार चिंतेत; काय आहे घसरणीचं कारण? कशी असेल प्रोसेस? » सर्वप्रथम, एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्याचा पर्याय निवडावा लागेल. » यानंतर, एटीएम स्क्रीनवर UPI सह रोख पैसे काढण्याचा पर्याय निवडावा लागेल. » यानंतर एटीएम मशीनच्या स्क्रीनवर QR कोड दिसेल. » स्मार्टफोनवरून हा QR कोड स्कॅन करून UPI अॅपमध्ये काढायची रक्कम एंटर करावी लागेल. » स्मार्टफोनमध्ये UPI पिन टाकावा लागेल. » पिन टाकताच एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येतील.