JOIN US
मराठी बातम्या / मनी / हॅकर्सपासून खातं सुरक्षित कसं करायचं? RBI ने दिली महत्त्वाची माहिती

हॅकर्सपासून खातं सुरक्षित कसं करायचं? RBI ने दिली महत्त्वाची माहिती

वेगवेगळ्या ट्रिक वापरुन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम लंपास करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : कोरोनानंतर लोक जास्त डिजिटलकडे वळले आहेत. अगदी बिल भरण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मोबाईलवर केल्या जात आहे. याचा फायदा हॅकर्स उचलत आहे. ते वेगवेगळ्या ट्रिक वापरुन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम लंपास करत आहेत. अशावेळी तुमचं खातं सिक्युअर कसं ठेवायचं याबाबत RBI ने माहिती दिली आहे. डिजिटायझेशनचे युग वाढत असताना, फसवणूक आणि सायबर क्राइमच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ग्राहकांना ओटीपी आणि सीव्हीव्हीसारखी माहिती कोणाशीही शेअर करू नये असे सांगितले आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार कष्टाने कमावलेले पैसे गायब करण्यासाठी हॅकर्स नवीन मार्ग शोधत आहेत. आर्थिक व्यवहार करताना ओटीपी आणि सीव्हीव्ही माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नये. व्यवहारादरम्यान जाणूनबुजून किंवा नकळत वैयक्तिक माहिती देऊन तुम्ही आर्थिक फसवणुकीला सहज बळी पडू शकता. सीव्हीव्ही किंवा डिजिटल व्यवहाराच्या वेळी OTP देऊ नये. आधार कार्ड पॅन कार्ड यासंदर्भातील कोणतीही माहिती आपल्या मित्रमंडळींना किंवा कोणालाही चुकूनही शेअर करू नका. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. गुगलवर किंवा इतर कोणत्याही साईटवरून आलेल्या मेसेज, नंबरवर विश्वास ठेवू नका.

चुकूनही थर्ड पार्टी अॅप, एनी डेस्क सारखे अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू नका. त्यामुळे तुमच्या फोनमधून महत्त्वाचा डेटा चोरला जाऊ शकतो. 5G अपडेट करणं, वीज बिल न भरणं, खात्यातून पैसे वजा होणं, E KYC अशा अनेक कारणांसाठी तुम्हाला जर फोन आला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या