JOIN US
मराठी बातम्या / मनी / दुर्मिळ नोटा आणि नाणी जमवण्याच्या छंदामुळे अडचणीत याल; RBI ने केलं सावध

दुर्मिळ नोटा आणि नाणी जमवण्याच्या छंदामुळे अडचणीत याल; RBI ने केलं सावध

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे काही लोक ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी आयबीआयचं नाव आणि लोगो वापरत आहेत.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 28 ऑक्टोबर : तुमच्यापैकी अनेकांना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा छंद असेल. काही दुर्मिळ नोटा आणि नाणी मिळवण्यासाठी तुम्ही कधी ना कधी फार आटापिटा केलाच असेल. अशातच जर तुम्हाला म्हटलं, की अशा दुर्मिळ नाणी आणि नोटांची विक्री होत आहे तर? निश्चितच तुमच्यापैकी काहीजण त्या खरेदी करण्याचा प्रयत्न करतील. गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटा आणि नाणी खरेदी-विक्रीचा ट्रेंड वाढला आहे. अनेकजण ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे जुन्या नोटा आणि नाणी विकत आहेत. याबाबत आता रिझर्व बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) नुकतीच महत्त्वाची माहिती जारी केली आहे. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे काही लोक ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या विक्रीसाठी आयबीआयचं नाव आणि लोगो वापरत आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा बँकेनं दिला आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महागाईचा पुन्हा बॉम्ब फुटणार? RBI पुन्हा वाढवणार व्याजदर? आरबीआयनं केलं ट्विट रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘काही घटक भारतीय रिझर्व्ह बँकेचं नाव आणि लोगो विविध ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर चुकीच्या पद्धतीनं वापरत आहेत. ही बाब बँकेच्या निदर्शनास आली आहे. बँकेचं नाव वापरून जुन्या नोटा आणि नाणी विकण्यासाठी ग्राहकांकडून कमिशन किंवा टॅक्स मागितला जात आहे.’ रिझव्‍‌र्ह बँकेनं आपल्या निवेदनात असंही म्हटलंय, की ‘बँक अशा प्रकारच्या कोणत्याही कृतीत सहभागी नाही. बँकेनं दुर्मिळ नोटा आणि नाण्यांच्या व्यवहारासाठी कधीही कोणाकडूनही शुल्क किंवा कमिशन मागितलेलं नाही. या शिवाय, बँकेनं अशा प्रकारच्या व्यवहारासाठी कोणतीही संस्था किंवा व्यक्तीला अधिकृत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सामान्य जनतेनं बनावट आणि फसव्या ऑफर्सना बळी पडू नये’. लोन घेताना कोणती कागदपत्र लागतात? आताच चेकलिस्ट तयार करा तुम्हीही जुनी नाणी आणि नोटा विकण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आरबीआयनं दिलेल्या सूचना नक्की वाचा. ऑनलाइन फसवणूक करणारे लोक सतत ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते रोज नवनवीन मार्ग शोधतात. त्यामुळे कुठलेही व्यवहार करताना सर्व माहिती घेतल्यानंतरच करावेत. दरम्यान, देशातील प्रमुख बँकांनी ‘आझादी का अमृत महोत्सवा’अंतर्गत नागरिकांना बँकिंग क्षेत्राशी निगडित असलेल्या गोष्टींबाबत शिक्षित करण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वेळोवेळी ट्विट करून ग्राहकांना फसवणुकीच्या घटनांपासून सावध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या