JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI ची पुन्हा एकदा 2 सहकारी बँकांवर कारवाई, तुमची बँक तर नाही?

RBI ची पुन्हा एकदा 2 सहकारी बँकांवर कारवाई, तुमची बँक तर नाही?

व्याज दर आणि ठेवींबाबत मध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजगुरुनगर सहकारी संस्था दोषी आढळली

जाहिरात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : रिझर्व्ह बँके ने सोमवारी दोन बँकांना दंड ठोठावला. त्यापैकी एक पुण्यातील राजगुरुनगर सहकारी बँक आणि दुसरी गुजरातमधील राजकोटची सहकारी बँक आहे. याआधी बँकेला 4 लाख तर दुसऱ्याला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. व्याज दर आणि ठेवींबाबत मध्यवर्ती बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजगुरुनगर सहकारी संस्था दोषी आढळली आहे. राजकोटच्या सहकारी बँकेने जनजागृती योजनेबाबतच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेने मृत खातेदारांच्या चालू खात्यांना रक्कम दिली नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झालं. आरबीआयने बँकेला नोटीस बजावून त्यावर दंड का आकारू नये, अशी विचारणा केली. आरबीआय बँक लेखी उत्तराने समाधानी नव्हती आणि निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यावर दंड ठोठावला. RBI ने काय म्हटलं? मध्यवर्ती बँकेने यासंदर्भात निवेदन जारी केलं. या निवेदनात आरबीआयने दिलेल्या अधिकारांतर्गतच हा दंड ठोठवण्यात आला. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या कलम 56, कलम 46 (4) आणि कलम 47 ए (1) (सी) अंतर्गत 2 सहकारी बँका दोषी आढळल्याचं आरबीआयने निवेदनात म्हटलं आहे. या आदेशाचा बँकेच्या कोणत्याही व्यवहारावर किंवा ग्राहकांवर परिणाम होणार नाही, असंही आरबीआयने म्हटलं आहे.

पुण्यातील सहकारी बँकेला झटका, रिझर्व्ह बँकेने रद्द केला परवाना, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

 को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोट आरबीआयच्या म्हणण्यानुसार बँकेच्या आर्थिक कागदपत्रांच्या तपासणीत असे दिसून आले आहे की त्यांनी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये ठेवलेली रक्कम 10 वर्षांपेक्षा जास्त काळ हस्तांतरित केली नव्हती. हे देखील वरील कलमांचे उल्लंघन आहे.

सहकारी बँकेलाही कारणे दाखवा नोटीस बजावून त्यावर दंड का आकारू नये, अशी विचारणा करण्यात आली होती. बँकेकडून लेखी आणि सविस्तर उत्तर मिळाल्यानंतर आरबीआयने बँकेला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा बँकेच्या ग्राहकांवर किंवा कोणत्याही व्यवहारावरही परिणाम होणार नाही.

Digital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही वाचा सविस्तर

संबंधित बातम्या

मागच्या महिन्यातही RBI कडून कारवाई RBI ने सप्टेंबर महिन्यात डॉक्टर आंबेडकर नागरिक सहकारी बँक मर्यादित, नागरिक सहकारी बँक मर्यादित, रवि कमर्शियल शहरी सहकारी बँक या तीन बँकांना नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंड ठोठावला होता. बँकेनं क्रमश: 1.50 लाख, 25,000 आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या