मुंबई, 05 जानेवारी: राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) शेअर बाजारातील असे गुंतवणूकदार (Share Market Investment) आहेत, ज्यांच्याकडे देशभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष असते. रिटेल गुंतवणूकदार त्यांनी कशात गुंतवणूक केली आहे, हे नेहमीच जाणून घेऊ इच्छितात. जाणून घ्या बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे टॉप 5 शेअर्स (Rakesh Jhunjhunwala top 5 Shares) ज्यातून कोट्यवधींचा रिटर्न मिळाला आहे. एनसीसी (NCC) राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala Portfolio) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीचे (NCC) 12.84 शेअर्स आहेत. एनसीसीमध्ये त्यांचे सुमारे 7.83 कोटी शेअर्स आहेत. सोमवारी हा शेअर NSE वर Rs 71.45 वर बंद झाला होता, म्हणजे या कंपनीत झुनझुनवाला यांची होल्डिंग Rs 561.80 कोटी आहे. गेल्या वर्षी या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ 9.5 रुपयांनी वाढली होती, परंतु शेअर्सची संख्या जास्त असल्याने झुनझुनवालांचे भांडवल गेल्या वर्षी 2021 मध्ये सुमारे 74.38 कोटी रुपयांनी वाढले आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) टाटा मोटर्स (Rakesh Jhunjhunwala investment in Tata motors) या दिग्गज ऑटो कंपनीमध्ये झुनझुनवालांची 1.11 टक्के भागीदारी आहे. त्यांच्याकडे टाटा मोटर्सचे 3.67 कोटी शेअर्स आहेत, सोमवारी NSE वर हा शेअर 497.6 रुपयांवर बंद झाला, या किंमतीनुसार या कंपनीत त्यांची 1826.19 कोटी रुपयांची होल्डिंग आहे. गेल्या वर्षी त्यांनी जून 2021 च्या तिमाहीत नफा कमावला होता त्यानंतर त्यांनी यातील भागीदारी विकून 1.3 टक्क्यांवरून 1.1 टक्क्यांवर आणली होती. हे वाचा- Petrol Diesel: महाराष्ट्रात काय आहे इंधन दर? या शहरात सर्वाधिक महाग आहे पेट्रोल फेडरल बँक (Federal Bank) राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची खाजगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेत 3.65 टक्के हिस्सेदारी आहे. झुनझुनवाला यांनी जूनच्या तिमाहीत या बँकेतील त्यांची हिस्सेदारी वाढवली होती आणि त्यानंतर सप्टेंबरच्या तिमाहीत पुन्हा त्यांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. सप्टेंबर तिमाहीसाठी उपलब्ध आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीचे फेडरल बँकेत 7.57 कोटी शेअर्स आहेत. NSE वर सोमवारी हा शेअर 87.2 रुपयांवर बंद झाला, त्यानुसार त्यांची होल्डिंग सुमारे 660.10 कोटी रुपये आहे. सेल (SAIL) राकेश झुनझुनवाला यांच्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील स्टील कंपनी SAIL मध्ये सुमारे 7.25 कोटी इक्विटी शेअर्स आहेत. त्यांची या कंपनीत 1.76 टक्के भागीदारी आहे. झुनझुनवाला यांनी गेल्या वर्षी जून 2021 च्या तिमाहीत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या स्टॉकचा समावेश केला होता. सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांनी हा हिस्सा आणखी वाढवला होता. या वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी NSE वर हा शेअर 110.10 रुपयांवर बंद झाला होता, या किंमतीनुसार झुनझुनवाला यांची सेलमध्ये रु. 798.22 कोटींची होल्डिंग आहे. हे वाचा- अर्थसंकल्पासंबंधी देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजवरच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी टायटन (Titan) BSE वर उपलब्ध शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीत 4.33 कोटी शेअर्स. ही भागीदारी 4.87 टक्के आहे. गेल्या वर्षी जून 2021 च्या तिमाहीत, त्यांनी टायटनमधील आपला हिस्सा कमी केला होता, मात्र लगेचच पुढील तिमाहीत त्यांनी यात वाढ केली होती. मार्च तिमाहीत टायटनमध्ये त्यांची 5.1 टक्के भागीदारी होती, जी जूनच्या तिमाहीत 4.8 टक्क्यांवर घसरली. पुढील तिमाहीत (जुलै-सप्टेंबर 2021) त्यांनी टायटनचे आणखी शेअर्स खरेदी केले. सोमवारी NSE वर हा शेअर 2523.85 रुपयांवर बंद झाला होता, यानुसार त्यांच्याकडे टायटनमध्ये रु. 10928.27 कोटी रुपयांची होल्डिंग आहे.