भारतीय रेल्वे
मुंबई, 7 जून: आपल्या देशामध्ये भारतीय रेल्वे हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे. देशभरात जवळपास 12 हजारांहून अधिक गाड्या धावतात. या गाड्या वेगवेगळ्या मार्गांवर प्रवाशांना घेऊन जातात. या ट्रेनमध्ये पॅसेंजर ट्रेन ते सुपरफास्ट एक्स्प्रेसचा समावेश आहे. पण यासोबतच रेल्वे एक वेगळ्याच प्रकारची ट्रेन चालवते. या ट्रेनला NMG ट्रेन म्हटलं जातं.
भारतीय रेल्वे पॅसेंजरपासून ते मालगाडीपर्यंत विविध प्रकारच्या गाड्या चालवते. यामध्ये एक विशेष रेल्वे ट्रेनचा समावेश आहे, ज्याला NMG ट्रेन असं म्हटलं जातं. प्रवासादरम्यान रेल्वे स्टेशनवर अशी ट्रेन तुम्ही अनेकदा पाहिली असेल, ज्याचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद असतात. ही ट्रेन पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. मग त्यांच्या मनात प्रश्न येतो की ही अशी कोणती ट्रेन आहे जी पूर्णपणे बंद राहते, तिच्या आत काय असतं? NMG ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद असतात. जर तुम्ही अशा गाड्या पाहिल्या असतील तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडेल की हा डबा कोणत्या कामासाठी वापरला जातो? अखेर बंद खिडक्यांच्या आत काय आहे? याच्या आत कोणी प्रवास करत आहे का? चला तर मग या ट्रेनविषयी जाणून घेऊया…
Indian Railway: ट्रेनमध्ये किती प्रकारचे डबे असतात, कोणता डबा आरामदायी? अवश्य घ्या जाणूनएनएमजी ट्रेनचा फूलफॉर्म New Modified Goods ट्रेन आहे. या गाड्यांमधून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल पोहोचवला जातो. पॅसेंजर गाड्यांचे मालगाड्यांमध्ये रूपांतर करून या गाड्या बनवल्या जातात. प्रवासी कोचचे एनएमजी कोचमध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचा वापर आणखी 5 ते 10 वर्षे केला जातो. प्रवासी डबा एनएमजी कोचमध्ये बदलण्यासाठी डबा पूर्णपणे सील करण्यात येतो. आतील सर्व सीट ओपन करुन काढले जातात. पंखा आणि लाईट काढले जातात. यासोबतच हे डब्बे आणखी मजबूत करण्यासाठी लोखंडी पट्ट्या लावल्या जातात.
Indian Railways:ट्रेनचं तिकीट कँसल न करताही बदलता येते प्रवासाची तारीख, पण कशी?ज्यावेळी सामान्य कोच 25 वर्षे सेवा पूर्ण करतो, तेव्हा त्याला सेवेतून मुक्त केले जाते. यानंतर ते ऑटो कॅरियरमध्ये रूपांतरित केले जातात आणि त्याचे नाव NMG रेक होते. याची रचना अशी तयार करतात ज्यामध्ये कार, मिनी ट्रक आणि ट्रॅक्टर सहजपणे लोड आणि अनलोड केले जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की ते पूर्ण सील झाल्यावर त्यात माल कसा ठेवला जातो. तर पूर्णपणे सील करणे म्हणजे फक्त खिडकी आणि दरवाजा लॉक करणे. डब्याच्या मागील बाजूस सामान ठेवण्यासाठी दरवाजा बनवलेला असतो.