ट्रेन लाइव्ह लोकेशन
नवी दिल्ली, 8 मे: आज तुम्हाला देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या फोनमध्ये इंटरनेट पाहायला मिळेल. त्याचा उपयोग विविध कामांसाठी केला जातो. यापैकी एक काम म्हणजे प्रवास करताना ट्रेनचे लाईव्ह लोकेशन चेक करणे. यामुळे तुम्ही ट्रेनच्या नेमक्या स्थानाची माहिती मिळवून तुमचं ठिकाण किती वाजता येणार आहे हे चेक करु शकता. आपण म्हटल्याप्रमाणे आजकाल जवळपास प्रत्येकाच्या फोनमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे पण अनेक वेळा ट्रेनमध्ये इंटरनेट काम करत नाही. तुम्हाला फक्त टॉवरचे सिग्नल मिळत असतात. म्हणजे तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता पण इंटरनेट चालत नाही. अशा वेळी काय करायचं?
इंटरनेट चालत नसेल तर मग तुम्ही ट्रेनचं लाइव्ह लोकेशन कसं चेक करणार? अशा परिस्थितीत ट्रेनचे लाईव्ह लोकेशन कसे शोधणार? त्याची ट्रिकही खूप सोपी आहे. Where is My Train नावाचे अॅप तुम्ही तुमच्या फोनमध्ये आधीच डाउनलोड करून ठेवा. इंटरनेट नसतानाही हे अॅप तुम्हाला तुमच्या ट्रेनचे अचूक लोकेशन सांगू शकणार आहे. यासाठी तुम्हाला अॅपमध्ये एक छोटासा बदल करावा लागेल.
IRCTC: या टूर पॅकेजने करा केदारनाथ-बद्रीनाथचे दर्शन, 1 जूनपासून सुरु होईल टूरया अॅपमध्ये लोकेशन शोधण्याचे 3 मोड आहेत. इंटरनेट, सेल टॉवर आणि जीपीएस. नंतरचे दोन्ही पर्याय ट्रेनमध्ये प्रवास करतानाच वापरता येतील. यापैकी सेल टॉवरचा पर्याय इंटरनेटशिवाय ट्रेनचे लाईव्ह लोकेशन सांगतो. खरंतर, सेल टॉवर मोडमध्ये, हे अॅप त्या वेळी ज्या ठिकाणाहून ट्रेन जात असेल त्या भागातील मोबाइल टॉवरचे सिग्नल कॅच करते. सर्वात जवळचा टॉवर कुठेही असला तरी त्याचे स्थान तुम्हाला या अॅपवर दिसेल. पण फोनमध्ये नेटवर्क येत नसेल तर हा पर्यायही काम करणार नाही.
रेल्वे स्टेशनवर विक्रेते MRP पेक्षा जास्त पैसे मागताय? अशी करा तक्रारइंटरनेट मोडमध्ये, ट्रेनचे लाइव्ह लोकेशन NTES च्या सर्व्हरवरून ओळखले जाते. रेल्वेकडून ते सतत अपडेट केले जाते आणि खासगी कंपन्यांचे अॅप्स येथून त्यांचा डेटा गोळा करतात. दुसरीकडे, जीपीएस मोडबद्दल बोलायचे झाले तर त्याचा थेट संबंध उपग्रहाशी आहे. सॅटेलाईटच्या मदतीने ट्रेनचे लाईव्ह लोकेशन ओळखले जाते. हा मोड ट्रेनमध्ये बसल्यावरच योग्य माहिती देतो.