JOIN US
मराठी बातम्या / मनी / Railway Knowledge:रेल्वे स्टेशनवरील उभ्या ट्रेनला चालण्यासाठी ग्रीन ऐवजी येलो सिग्नल का दाखवतात?

Railway Knowledge:रेल्वे स्टेशनवरील उभ्या ट्रेनला चालण्यासाठी ग्रीन ऐवजी येलो सिग्नल का दाखवतात?

Railway Knowledge: सामान्यतः ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्यावरच ट्रेन धावते. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर लूप लाईनवर उभी असलेली ट्रेन पिवळा सिग्नल दाखवल्यावरही पुढे जाते. याचं नेमकं कारणं काय आहे हे आज आपण पाहणार आहोत.

जाहिरात

रेल्वे येलो सिग्नल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 जून : भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. एवढ्या ट्रेन धावतात यासाठी काही नियम आहेत. ट्रेन योग्य पद्धतीने चालवण्यात ट्रॅकवरील सिग्नल्स आणि संकेतांची महत्त्वाची भूमिका असते. गाडी कधी पुढे न्यायची आणि कधी थांबवायची हे लोको पायलटला कळते. हे सर्व त्यांना सिग्नलवरूनच कळते. हिरवा सिग्नल म्हणजे ट्रेन पुढे नेली जाऊ शकते अशी सूचना मिळते. तर लाल सिग्नल म्हणजे ट्रेन ताबडतोब थांबवावी लागते. पण, सिग्नल हिरवा झाल्यावरच गाडी पुढे सरकते असे नाही. ट्रेन चालवण्यासाठी अनेकदा पिवळा सिग्नलही दिला जातो. हा सिग्नल मिळताच लोको पायलट हळू हळू ट्रेन पुढे सरकवू लागतो.

येलो सिग्नल म्हणजे रेल्वे स्टेशनवर उभी असलेली ट्रेन सुरू करून पुढे मेन लाइनकडे नेण्याचा संकेत असतो. प्लॅटफॉर्मवरील पहिल्या ट्रेनला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला जागा देण्यासाठीही हे दाखवले जाते. रेल्वे स्टेशनवर लूप लाइनवर ट्रेन उभी असताना हा सिग्नल दिला जातो. लूप लाइनवरील सिग्नलला स्टार्टर सिग्नल म्हणतात. जेव्हा लूप लाईनवर उभ्या असलेल्या ट्रेनला पिवळा सिग्नल दाखवला जातो, तेव्हा लोको पायलट आता ट्रेन सुरू करू शकतो आणि हळू पुढे जाऊ शकतो असा संकेत आहे. अनेकदा यासाठी डबल येलो सिग्नलही दाखवला जातो.

ग्रीन सिग्नल नसतो

लूप लाइनच्या सिग्नलमध्ये केवळ रेड आणि येलो लाइटच असतो. यामध्ये ग्रीन लाइट नसतो. येलो सिग्नल मिळाल्यावर गाडी पुढे जाते. मात्र याचा वेग लूप लाइनवर 30 किलोमीटर प्रतितासापेक्षा जास्त नसते. असं होतं कारण या लाइनची ही स्पीड लिमिट आहे. लूप लाइननेच गाडी मेन लाइनवर जाते. तिथेही एक स्टार्टर सिग्नल असतो. ज्याला अडव्हान्स सिग्नल म्हणतात. अडव्हान्स सिग्नल ग्रीन मिळताच लोको पायलट मेन लाइनवर गाडीला पूर्ण स्पीडने पळवू शकतो. मेन लाइनच्या अडव्हान्स स्टार्टर सिग्नलमध्ये तिन्हीही लाइट म्हणजेच ग्रीन, रेड आणि येलो असतात.

Train wheel: ट्रेनची चाकं बदलताना येतात नाकी नऊ! बदलण्याची प्रोसेस पाहून तुम्हीही व्हाल चकीत

सिग्नलच्या सहाय्यानेच चालते ट्रेन

ट्रॅकवर सिग्नल बसविल्याशिवाय गाड्या चालवणे शक्य नाही. लाल, हिरवे आणि पिवळे सिग्नल रेल्वेचे डोळे म्हणून काम करतात. सिग्नल पाहूनच ट्रेन सुरू करण्याचा किंवा थांबवण्याचा निर्णय लोको पायलट घेत असतो. आता रेल्वेत ऑटोमॅटिक सिग्नलिंग यंत्रणा आली आहे. रेल्वे रुळांच्या शेजारी बसवलेला एक्सल काउंटर बॉक्स देखील रेल्वेचे डबे मागे सोडल्यावर आपोआप लाल सिग्नल देतो.

Railway : जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्टेशनवर आहे सीक्रेट प्लॅटफॉर्म! इथून कुठे जाते ट्रेन

संबंधित बातम्या

या बॉक्समध्ये दर तीन ते पाच किलोमीटर अंतरावर एक स्टोरेज डिव्हाईस बसवलेले असते. जे थेट रेल्वे ट्रॅकशी जोडलेले असते. जेव्हाही ट्रेन जाते तेव्हा रुळांच्या बाजूला असलेले बॉक्स ट्रेनचे एक्सल मोजतात, जेणेकरून ट्रेनने स्टेशन सोडले तितकेच एक्सल त्यात अजुनही आहेत की नाही हे कळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या