JOIN US
मराठी बातम्या / मनी / IRCTC Tour Package: 15 हजार रुपयात चार दिवस गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या पॅकेज डिटेल्स

IRCTC Tour Package: 15 हजार रुपयात चार दिवस गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या पॅकेज डिटेल्स

IRCTC Tour Package: भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीकडून तुम्हाला Statue Of Unity, अहमदाबाद आणि वडोदरा पाहण्याची सुवर्ण संधी मिळतेय. चला तर मग जाणून घेऊया या पॅकेजविषयी सविस्तर…

जाहिरात

गुजरात टूर पॅकेज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

IRCTC Tour Package: गुजरात फिरणयासाठी इच्छुक असणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने गुजरात फिरण्यासाठी एक नवीन रेल्वे टूर पॅकेज लॉन्च केलं आहे. हा प्रवास मुंबईहून दर शुक्रवारी सुरु होईल. या टूर पॅकेजचं नाव Kewadia With Ahmedabad Ex Mumbai ठेवण्यात आलंय. IRCTC ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. IRCTC चे हे टूर पॅकेज 4 दिवस आणि 3 रात्रीचे असेल. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये प्रवास करता येईल. या पॅकेजच्या माध्यमातून पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी, अहमदाबाद आणि वडोदरा येथे जाण्याची संधी मिळणार आहे. टूर पॅकेजेसच्या ऑक्यूपेंसीच्या हिशोबाने दर बदलतील. या प्रवासाचे भाडे 15,440 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते.

जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे Statue Of Unity गुजरातमधील वडोदरा येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ बांधलेला विशाल पुतळा पाहण्यासाठी अनेक पर्यटक तेथे जातात. नर्मदा नदीच्या बेटावर 597 फूट उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा तयार करण्यात आला आहे. Railway Knowledge: 28 ट्रेनच्या बरोबरीची एकच ट्रेन! इंजिनच्या अखेरच्या कोच जवळ जायला लागतो सव्वा तास टूर पॅकेज 8 रात्री आणि 9 दिवसांचे असेल डेस्टिनेशन - अहमदाबाद आणि वडोदरा पॅकेजचे नाव – केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई (WMR148) क्लास - चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार मील प्लान - नाश्ता, रात्रीचे जेवण आणि ऑनबोर्ड मील IRCTC Tour Package: आता स्वस्तात करता येईल लडाखची सैर! IRCTC ने आणलंय खास पॅकेज बुकिंग कशी करायची? IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येईल. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या