MHADA Lottery
पुणे : तुमच्या हक्काचं आणि बजेटमध्ये बसणारं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. म्हाडाने पुण्यातील 5,990 घरांसाठी अर्ज कऱण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यामध्ये 2,908 घरं ही पहिल्यांदा येऊन घर घेईल अशा लोकांना घर देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे. याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी असणार आहे. तुम्ही अजूनही जर या घरांसाठी अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार या लॉटरीचा निकाल 1 7 फेब्रुवारीला लागणार आहे. तुम्ही जर म्हाडासाठी अजूनही अर्ज केला नसेल तर म्हाडाच्या ऑफिशियल साईटवर जाऊन mhada.gov.in वर जाऊन नोंदणी करा. तिथे तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अर्ज भरता येणार आहे. केवळ 6 कागदपत्रांच्या आधारे यावेळी तुम्ही घरासाठी अर्ज करू शकता. गेल्या आठवड्यात म्हाडाने मोबाईल अॅप देखील लाँच केलं आहे. त्या अॅपवरून देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे. वेबसाईटवरुन अर्ज करताना अनेक अडचणी येतात. याशिवाय सगळ्यांकडेच लॅपटॉप किंवा कंम्पुटर असतो असं नाही. त्यामुळे मोबाईल फोनवरून देखील अर्ज करता येणार आहे.
Mhada Lottery 2023 : आता 21 नाही तर फक्त 7 कागदपत्र जमा करा आणि घर घ्याअर्ज करणाऱ्यांसाठी तुमचा रहिवासी दाखला, उत्पन्न, पॅन कार्ड, आधार कार्ड, 15 वर्ष महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा आणि कोट्यातून घर घेत असाल तर त्यासंबंधित कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच पुढची प्रक्रिया केली जाईल.
पहिल्यांदाच म्हाडाचं रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा300 ते 600 चौरस फूटांपर्यंत ही घरं आहेत. म्हाडाकडून वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. ही लॉटरी पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे. जी सिस्टिमद्वारे असेल. यामध्ये मानवी हस्तक्षेप कुठेही होणार नाही. याशिवाय नागपूर महानगर आणि मुंबईसाठी देखील म्हाडाने लॉटरीच्या सूचना काढल्या आहेत. यासंदर्भातील अधिक माहिती म्हाडाच्या साईटवर देखील तुम्हाला मिळणार आहे.