पीपीएफ
मुंबई, 2 जुलै : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफला लोकांची खूप पसंती मिळते. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत चक्रवाढ व्याजाचा लाभ 7.1 टक्के दराने उपलब्ध आहे. गॅरंटीड रिटर्न देणारी ही सरकारी योजना खूप लोकप्रिय आहे. PPF 15 वर्षात मॅच्योर होते. मॅच्योरिटीच्या वेळी गुंतवणूकदाराला तीन ऑप्शन दिले जातात. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
पहिला ऑप्शन पीपीएफच्या मॅच्युरिटीनंतर, तुम्ही व्याजासह संपूर्ण रक्कम काढू शकता आणि तुमच्या आवडीनुसार ती कुठेही वापरू शकता. संपूर्ण रक्कम तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्हाला पीपीएफ अकाउंट उघडलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक फॉर्म सबमिट करावा लागेल. काही दिवसातच तुमचे व्याजासह संपूर्ण पैसे अकाउंटमध्ये येतात. दुसरा ऑप्शन तुमची इच्छा असल्यास, तुम्ही पीपीएफ अकाउंटमध्ये तुमचे कॉन्ट्रीब्यूशन पुढे चालू ठेवू शकता आणि पुढील 5 वर्षांसाठी हे अकाउंट वाढवू शकता. यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिस, जेथे तुमचे अकाउंट असेल तेथे अर्ज द्यावा लागेल. तुम्हाला हा अर्ज मॅच्युरिटीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी द्यावा लागेल आणि एक्सटेंशनसाठी एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म त्याच पोस्ट ऑफिस/बँक शाखेत सबमिट केला जाईल जिथे PPF खाते उघडले गेले आहे. तुम्ही हा फॉर्म वेळेत सबमिट करू शकत नसाल तर तुम्ही खात्यात योगदान देऊ शकणार नाही. या 5 वर्षांमध्ये गरज पडल्यास तुम्ही पैसेही काढू शकता. PPF: तुम्हीही पीपीएफ अकाउंट ओपन केलंय? मग Form D विषयी माहिती असायलाच हवी तिसरा ऑप्शन तुमची इच्छा असल्यास, 15 वर्षांनंतर, तुम्ही गुंतवणूक चालू न ठेवताही तुमच्या ठेवीवर व्याज घेऊ शकता. यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसला कळवण्याची गरज नाही. 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्ही रक्कम काढली नाही तर हा ऑप्शन आपोआप लागू होईल. या अकाउंटमधून तुम्ही कधीही कितीही पैसे काढू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण पैसेही काढू शकता. यामध्ये तुम्हाला एफडी आणि सेव्हिंग अकाउंटचीही सुविधा मिळते. PPF Rule: एक व्यक्ती किती पीपीएफ अकाउंट ओपन करु शकते? याची लिमिट काय? जाणून घ्या नियम पीपीएफचे फायदे PPF अकाउंटमध्ये थोडी रक्कम जमा करूनही तुम्ही भरपूर पैसे जोडू शकता. जर तुम्ही या योजनेत दरमहा 2000 रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक 24,000 रुपये जमा होतील. अशा वेळी, 15 वर्षांमध्ये, तुम्ही रु.3,60,000 जमा कराल आणि 7.1 नुसार, तुम्हाला रु.2,90,913 व्याज म्हणून मिळतील आणि 15 वर्षात, रु.6,50,913 जमा होतील. दुसरीकडे, तुम्ही या योजनेत आणखी 5 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, तुम्हाला 10,65,326 रुपये जोडले जातील. यासोबतच, तुम्हाला पीपीएफवर टॅक्स बेनिफिट्सही मिळतात. ही योजना EEE कॅटेगिरी अंतर्गत येते, त्यामुळे तुम्हाला या योजनेत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवर टॅक्स सूटचा लाभ मिळतो. तसेच, गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीच्या एकूण रकमेवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. यामध्ये, इन्कम टॅक्स सेक्शन 80C अंतर्गत, वार्षिक 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळू शकते.