जुनं घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी
नवी दिल्ली, 19 जुलै : तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करता तर घराची किंमत, लोकेशन, बिल्डिर, लोन अशा अनेक गोष्टींविषयी चौकशी करतात. अनेकदा तर पैशांची समस्या किंवा प्राइम लोकेशन, चांगल्या डीलमुळे लोक रीसेल होम खरेदी करणे एक चांगला पर्याय मानतात. रीसेल प्रॉपर्टी खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला घरात राहायला जाण्यासाठी घराचं पूर्ण बांधकाम होण्याची वाट पाहावी लागत नाही. तुम्हाला आवडत्या लोकेशनवर प्रॉपर्टीचं पजेशन लगेच मिळतं.
रिअल इस्टेट तज्ञ सांगतात की अनेक प्रसंगी जुने घर घेणे फायदेशीर ठरते. मात्र, जुने घर घेताना अनेक बाबी तपासून घ्याव्यात, अशा सूचना सर्व तज्ज्ञांनी देणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रॉपर्टीचे वय. म्हणजे ती इमारत किती जुनी आहे हे अवश्य तपासावे. Property Rules: जमीन कोणाच्या नावावर आहे हे कसं कळेल? जुने पेपर्स कसे काढायचे? दोन मिनिटात मिळेल माहिती प्रॉपर्टीचं वय किती? मालमत्तेचे वय म्हणजे घर किती जुने आहे आणि त्याची किती लाइफ शिल्लक आहे. तुम्ही खूप जुनी मालमत्ता (जी 50 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे) खरेदी करणे टाळावे. कारण इमारतीमध्ये संरचनात्मक समस्या असू शकतात आणि मोठ्या दुरुस्ती, नूतनीकरण किंवा काही प्रकरणांमध्ये पुनर्बांधणीची गरज पडू शकते. इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला जास्त काळ भाड्याच्या घरात राहावे लागेल आणि ते तुमच्यासाठी गैरसोयीचे ठरेल. विनाकारण तुम्हाला घर बदलण्याचा त्रास सहन करावा लागेल. Property : कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या नावार प्रॉपर्टी करायचीये? ही आहे प्रोसेस, होणार नाही कोणताच वाद फ्लॅट आणि स्वतंत्र घराचे वय वेगळे असते साधारणपणे, कॉंक्रिट स्ट्रक्चरचे सरासरी वय 75 ते 100 वर्षे मानले जाते. हे अनेक घटकांवर अवलंबून असते. साधारणपणे, अपार्टमेंटचे आयुष्य 50-60 वर्षे असते, तर जमिनीवर बांधलेल्या घराचे आयुष्य यापेक्षा जास्त असते. या कारणास्तव, रीसेल फ्लॅटची किंमत घराच्या तुलनेत कमी असते. कोणतीही मालमत्ता जुनी झाली की तिचे मूल्यही कमी होत जाते. घराच्या तुलनेत फ्लॅटची किंमत अधिक वेगाने घसरते. घर घेण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी योग्य संशोधन करून मालमत्तेची मूळ कागदपत्रे पाहण्यावर जोर द्या. ज्या प्रॉपर्टीवर सावकाराची एखादी थकबाकी आहे का? त्या मालमत्तेवर कोणतेही कर्ज घेतलेलं आहे का? हे सर्व चेक करायला हवं. रीसेल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्ही स्वत: होम लोनसाठी अर्ज करत असल्यास, तुमच्या स्वत:च्या सावकाराकडून कागदपत्र योग्यरित्या तपासून घ्या. रीसेल मालमत्ता खरेदी करताना, तुम्हाला ट्रान्सफर आणि रजिस्ट्रेशन फीस भरावी लागेल. काही अधिकारक्षेत्रांमध्ये, हे शुल्क भरीव रक्कम असू शकते आणि रीसेल प्रॉपर्टी खरेदी करण्याचे फायदे शून्य करु शकते.