JOIN US
मराठी बातम्या / मनी / Property Rules: जमीन कोणाच्या नावावर आहे हे कसं कळेल? जुने पेपर्स कसे काढायचे? दोन मिनिटात मिळेल माहिती

Property Rules: जमीन कोणाच्या नावावर आहे हे कसं कळेल? जुने पेपर्स कसे काढायचे? दोन मिनिटात मिळेल माहिती

How to check property ownership: तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखाद्या जमीन किंवा प्लॉटची रजिस्ट्री अनेक लोकांच्या नावावर असते. यामुळे हे दोन्हीही खरेदी करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते. कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी त्याचा खरा मालक कोण आहे हे तुम्ही चेक करु शकता.

जाहिरात

प्रॉपर्टी कोणाच्या नावावर हे असं करा चेक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जुलै : घर-बंगला, जमीन किंवा प्लॉट खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला वाटतं की, त्याचं स्वतःचं आलिशान घर असावं. लोक गुंतवणुकीच्या हिशोबानेही प्रॉपर्टी मध्ये पैसे लावतात. मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रजिस्ट्री दरम्यान फसवणुकही मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही पाहिलं असेल की, एकाच प्लॉटची रजिस्ट्री अनेक लोकांच्या नावावर असते. अशा वेळी अनेकदा तर लोकांच्या हातून पैसा आणि प्रॉपर्टी दोन्हीही निघून जातं. यामुले कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी पूर्ण माहिती काढणं आणि चौकशी करणं गरजेचं असतं. पहिले तुम्हाला जमीन खरेदी करण्यासाठी पटवारींकडून जमीन मालकाची माहिती घ्यावी लागत असे. मात्र आता महसूल विभागाने डेटा ऑनलाइन केला आहे. याचा फायदा असा की, लोकांना आता जमिनीचा मालक जाणून घेण्यासाठी पटवारीकडे जाण्याची गरज नाही. या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तुम्ही भू नक्क्षा, भुलेख, खातेवहीची प्रत इत्यादींच्या नोंदी तपासू शकता. Home Loan Tips: होम लोन घेताना फक्त व्याजदर नाही तर ‘या’ 5 गोष्टीही अवश्य घ्या समजून, होईल फायदाच फायदा दोन मिनिटांत मिळेल माहिती आपण महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून जमिनीशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकतो. या प्रक्रियेसाठी पूर्वी महसूल विभागात जावे लागत होते. पण आता ही माहिती तुम्ही काही मिनिटांत घरबसल्या मिळवू शकता. जमिनीच्या माहितीमध्ये तुम्ही भू नक्ष, भुलेख, खातेवहीची प्रत इत्यादी रेकॉर्ड तपासू शकता. Property Rule : रेंट अ‍ॅग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं? ही आहे ऑनलाइन प्रोसेस जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस -सर्वप्रथम, तुम्हाला राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. -आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा. -त्यानंतर तहसीलचे नाव निवडावे लागेल. -आता तुम्हाला ज्या गावाची जमिनीविषयी जाणून घ्यायचे आहे त्या गावाचे नाव निवडा. -जमिनीच्या माहितीशी संबंधित पर्यायांमधून ‘खातेदाराच्या नावाने शोधा’ हा ऑप्शन निवडा. -आता जमिनीच्या मालकाच्या नावाचे पहिले अक्षर निवडा आणि सर्च बटणावर क्लिक करा. -दिलेल्या लिस्टमधून जमिनीच्या मालकाचे नाव निवडा. -आता Captcha Code Verify टाका. -व्हेरिफाय होताच स्क्रीनवर अकाउंटचे डिटेल्स ओपन होतील. -यामध्ये खसरा क्रमांकासह त्या खातेदाराच्या नावावर किती जमीन आहे याची सर्व माहिती तुम्ही पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या