JOIN US
मराठी बातम्या / मनी / Sarkari Yojana : हे आहे सर्वात स्वस्त टर्म इन्शुरन्स, 36 रु महिन्यात मिळेल 2 लाखांचं कव्हर!

Sarkari Yojana : हे आहे सर्वात स्वस्त टर्म इन्शुरन्स, 36 रु महिन्यात मिळेल 2 लाखांचं कव्हर!

Sarkari Yojana : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 436 रुपये आहे. हे एका वर्षाच्या कालावधीसाठी घेतले जाऊ शकते आणि दरवर्षी रिन्यू केले जाऊ शकते.

जाहिरात

टर्म इन्शुरन्स प्लान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 मे: टर्म इन्शुरन्स प्लॅन सध्या अनेक लोक घेत आहेत. आपल्या कुटुबासाठी हा प्लान खूप फायदेशीर असतो. केंद्र सरकारही अशी विमा योजना चालवते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या नावाने चालवल्या जाणार्‍या या विमा योजनेत, लाभार्थीचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला तर नॉमिनी व्यक्ती किंवा कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा आजार किंवा अपघातामुळे मृत्यू झाल्यास, विमाधारकाच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. महत्त्वाचं म्हणजे या विमा संरक्षणासाठी वर्षाला फक्त 436 रुपये प्रीमियम भरावा लागतो. जीवन ज्योती विमा काढण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे.

18 ते 50 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. 25 मे ते 31 मे दरम्यान विमाधारकाच्या खात्यातून दरवर्षी 436 रुपयांचा प्रीमियम आपोआप कट होतो. ऑटो डेबिट संमती द्यावी लागेल, तरच अकाउंटमधून पैसे कापले जातील आणि विमा काढला जाईल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना एक वर्षासाठी आहे आणि ती दरवर्षी रिन्यू केली जाऊ शकते. या योजनेचा कव्हर कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे. म्हणजेच PMJJBY पॉलिसी कोणत्याही तारखेला खरेदी केली तरी पहिल्या वर्षासाठी तिचे कव्हरेज पुढील वर्षाच्या 31 मे पर्यंत असेल. रिस्क कव्हर इनरोलमेंट करण्याच्या 45 दिवसांपासून उपलब्ध आहे.

एकाच पॉलिसीत लाइफ, हेल्थ अन् कार इन्शुरन्स! पाहा IRDA चा खास प्लान

विमा कसा करायचा?

भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि इतर खाजगी जीवन विमा कंपन्या देखील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा काढतात. याशिवाय तुमचे अकाउंट असलेल्या बँकेत जाऊनही तुम्ही याबाबत माहिती घेऊ शकता. अनेक बँकांनी विमा कंपन्यांशी टाय-अप केले आहे आणि बँकेकडूनच तुम्ही हा टर्म इन्शुरन्स प्लान घेऊ शकता.

तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता का? मग ही माहिती तुम्हाला असायलाच हवी

संबंधित बातम्या

इन्शुरन्स क्लेम कसा मिळतो?

ज्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने विमा उतरवला होता त्या इन्शुरन्स कंपनी किंवा बँकेकडे नॉमिनी किंवा कुटुंबाला दावा दाखल करावा लागतो. मृत्यू प्रमाणपत्रासह इतर काही कागदपत्रे सादर केल्यानंतर विम्याची रक्कम मिळते. जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल, तर तुमचं बँक अकाउंट आवश्यक आहे हे लक्षात ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या