संग्रहित फोटो
मुंबई: भविष्याकरिता बचतीसाठी पैशांच्या गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ . पीपीएफमधून चांगला परतावा मिळ तो आणि करबचतही होते. पीपीएफवरचं व्याज कसं मोजलं जातं हे माहिती असेल, तर तुम्ही अधिक व्याजाचा लाभ मिळवू शकता. व्याज मोजण्याच्या पद्धती काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊ या. व्याजदरात बदल होण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून पीपीएफच्या व्याजदरात बदल केला जाण्याची अपेक्षा होती. परंतु सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत जुन्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 30 मार्च 2020 रोजी व्याजदरात कपात केली होती. त्या वेळी पीपीएफ व्याजदर 7.1 टक्के करण्यात आला होता. आतापर्यंत तो 7.1 टक्क्यांवर कायम आहे. आता डिसेंबरमध्ये संपणाऱ्या तिमाहीत त्यात बदल होऊ शकतो, अशी शक्यता आहे. दीड कोटींचा फंड असा होणार तयार एका वर्षात पीपीएफ अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. 15 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर पीपीएफ अकाउंटची मुदत 5-5 वर्षांच्या टप्प्याने वाढवू शकता. दर महिन्याला 12,500 रुपये गुंतवत असलात, तर 30 वर्षांनंतर तुमच्या PPF अकाउंटमधला फंड 1.5 कोटी (1,54,50,911) रुपयांपेक्षा जास्त असेल. यामध्ये तुमची गुंतवणूक 45 लाख असेल आणि व्याजातून मिळालेलं उत्पन्न सुमारे 1.09 कोटी रुपये असेल. तुम्ही या सरकारी योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितकाच जास्त त्याचा फायदा तुम्हाला होईल. समजा तुमचं वय 25 वर्षं आहे आणि तुम्ही पीपीएफमध्ये वर्षाकाठी 1.5 लाख रुपये गुंतवले, तर वयाच्या 55 व्या वर्षी म्हणजेच रिटायरमेंटच्या 5 वर्षं आधी तुम्ही करोडपती होऊ शकता.
शाळेची फी भरण्यासाठी हवीये मोठी रक्कम? PPF खात्याची होईल मोठी मदतपीपीएफवर दर महिन्याला व्याज मोजलं जातं; पण ते आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा होतं. म्हणजेच, तुम्ही दरमहा जे काही व्याज कमवाल ते 31 मार्च रोजी तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये टाकलं जाईल. तसंच पीपीएफ खात्यात पैसे कधी जमा करायचे याची कोणतीही निश्चित तारीख नाही. तुम्ही पीपीएफमध्ये तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पैसे जमा करू शकता. पीपीएफवर जास्त व्याज कसं मिळवायचं पीपीएफवरचं व्याज दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत खात्यात असलेल्या रकमेवर मोजलं जातं. म्हणजेच, पीपीएफ खात्यात कोणत्याही महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जेवढे पैसे असतील, त्या पैशावर त्याच महिन्यात व्याज मिळेल. 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर त्यावरचं व्याज पुढच्या महिन्यात मिळेल.
पीपीएफ का सुकन्या समृद्धी? मुलींच्या भविष्यासाठी बेस्ट योजना कोणती?पीपीएफ कॅल्क्युलेशन काही सोप्या उदाहरणांनी समजून घेऊ. उदाहरण नंबर 1 समजा, तुम्ही 5 एप्रिल रोजी तुमच्या खात्यात 50,000 रुपये जमा केले. 31 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात आधीपासूनच 10 लाख रुपये आहेत. 5 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत तुमच्या पीपीएफ खात्यातली एकूण रक्कम 10,50,000 रुपये होती. त्यावर 7.1% दराने मासिक व्याज झाले - (7.1% / 12 X 1050000) = 6212 रुपये उदाहरण नंबर 2 आता समजा तुम्ही 50000 रुपये 6 एप्रिल रोजी जमा केले. 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुमच्या खात्यातली रक्कृम 10 लाख रुपये असेल. यावर 7.1% दराने मासिक व्याज (7.1%/12 X 10,00,000) = 5917 रुपये इतकं होईल.
असे पैसे जमा केल्याने मिळेल जास्त व्याज या दोन्ही उदाहरणांत गुंतवणुकीची रक्कम 50,000 रुपये आहे. परंतु जमा करण्याच्या पद्धतीमुळे व्याजात फरक पडला. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पीपीएफमधल्या पैशांवर जास्तीत जास्त व्याज पाहिजे असेल, तर ही युक्ती लक्षात ठेवा आणि कायम महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा करा. जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याचे व्याज त्याच महिन्यात मिळेल. ू पीपीएफमधल्या वार्षिक दीड लाखांची गुंतवणुकीवर टॅक्सची सूट मिळते. त्यामुळे करसवलत घ्यायची असेल, तर नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच शक्य असल्यास 1 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान संपूर्ण 1.5 लाख रुपये इतकी रक्कम जमा करा. ते शक्य नसेल तर मग दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा करा, जेणेकरून त्या महिन्याचं व्याज त्याच महिन्यात मिळेल, असा सल्ला तज्ज्ञ देतात.