JOIN US
मराठी बातम्या / मनी / या स्कीममध्ये गुंतवा 10000 रुपये, मॅच्युरिटीवर होईल 16 लाखांचा फायदा; पाहा डिटेल्स

या स्कीममध्ये गुंतवा 10000 रुपये, मॅच्युरिटीवर होईल 16 लाखांचा फायदा; पाहा डिटेल्स

या स्कीमच्या माध्यमातून खूप कमी रकमेच्या गुंतवणुकीने तुम्ही सुरूवात करू शकता. याशिवाय ही स्कीम सरकारी असल्याने तुमचे पैसेही पूर्णतः सुरक्षित राहतील.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : जर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणुकीच्या (Safe Investment Planning) शोधात असाल आणि तुम्हाला गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल, तर पोस्ट ऑफिस (Post Office) विभागातील गुंतवणुकीचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. पोस्ट ऑफिस स्कीम्स (Post office scheme) मध्ये तुम्हाला चांगले रिटर्न (Investment and Return) ही मिळतात. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम (Post Office Small Savings Scheme) चांगल्या असतात. यामध्ये कमी रकमेच्या गुंतवणुकीवर तुम्ही चांगलं उत्पन्न (Earn Money) मिळवू शकता. अशाच एका पोस्ट ऑफिसच्या स्कीमचं नाव आहे – पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit). काय आहे पोस्ट ऑफिस RD स्कीम? एकूण या स्कीमच्या माध्यमातून खूप कमी रकमेच्या गुंतवणुकीने तुम्ही सुरूवात करू शकता. याशिवाय ही स्कीम सरकारी असल्याने तुमचे पैसेही पूर्णतः सुरक्षित राहतील. यामध्ये तुम्ही कमीतकमी 100 रुपये दरमहा अशी गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त अशी काही मर्यादा नाही. तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट अकाउंट उत्तम व्याजदरांसोबत छोट्या हप्त्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी सरकारची एक चांगली गॅरंटी योजना आहे.

हे वाचा -  लॉकडाउनमधील बिझनेस आयडियाला ‘शार्क टँक इंडिया’मधून मिळाली लाखोंची गुंतवणूक

जाणून घ्या किती मिळेल व्याज? पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये जे RD अकाउंट उघडलं जातं ते 5 वर्षांसाठी असतं. यापेक्षा कमी वेळासाठी ते उघडता येत नाही. दर तिमाहीला (वार्षिक दरांनुसार) जमा रकमेवर व्याजाचं कॅल्क्युलेशन केलं जातं. मग ती प्रत्येक तिमाहीतील मुद्दलाची रक्कम आणि त्यावर आलेलं व्याज शेवटी अकाउंटमध्ये चक्रवाढ व्याजासोबत (Compound Interest) जमा केली जाते. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटनुसार, RD स्कीमवर सध्या 5.8 टक्के एवढा व्याजदर दिला जात आहे. केंद्र सरकार दर तिमाहीला आपल्या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्ससाठी (Small Saving Schemes) व्याज दराची घोषणा करतं.

हे वाचा -  PM Cares for Children योजनेअंतर्गत मिळतील 10 लाख,वाचा कोण आहे या लाभासाठी पात्र?

10 हजार रुपये गुंतवल्यास मिळतील 16 लाखांपेक्षा अधिक जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या RD स्कीममध्ये 10 हजार रुपये गुंतवले आणि तेही 10 वर्षांकरता तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 16,26,476 लाख रुपये मिळतील. RD अकाउंटबाबत काही खास गोष्टी जर तुम्ही वेळेवर RD हप्ता जमा नाही केला तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. हप्ता भरण्यास उशीर झाल्यास तुम्हाला दर महिन्याला एक टक्का दंड द्यावा लागेल. सोबतच तुम्ही लागोपाठ 4 हप्ते न भरल्यास तुमचं अकाउंट बंद होईल. तरी अकाउंट बंद झाल्यावर ते पुढच्या 2 महिन्यांमध्ये पुन्हा अॅक्टिव्हेट करता येतं. तुम्हालाही चांगल्या आणि सुरक्षित योजनेत पैसे गुंतवायचे असल्यास पोस्ट ऑफिसमध्ये वरील योजनेबाबत माहिती घेऊन गुंतवणूकीला सुरूवात करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या